शितलदेवी : "जिद्दीच्या बळावर इतिहास घडवणारी तिरंदाज".. खेळ ही केवळ शारीरिक ताकदाची चाचणी नाही, तर मनगटातील जिद्द, डोक्यातील धारदार रणनीती आणि मनगटाला मिळणाऱ्या आत्मविश्वासाचीही परीक्षा असते. विशेषतः पॅरा खेळाडूंसाठी हा प्रवास अधिक खडतर असतो. शितलदेवी ही त्या जिद्दीचे मूर्तिमंत रूप आहे.जन्मजात फोकोमेलिया या दुर्मिळ विकारामुळे तिच्या हात-पायांची वाढ अपूर्ण राहिली. मात्र, शारीरिक मर्यादा तिच्या यशाच्या आड कधीच आल्या नाहीत. तिने संकल्प केला, बाण उचलला आणि तिरंदाजीच्या मैदानावर इतिहास घडवला.पॅरा ऑलिंपिक, नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप, जागतिक आर्चरी चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धांमध्ये पदकांची मालिका उभी करत तिने आपल्या बाणाने फक्त लक्ष्यच नाही, तर लोकांच्या मनालाही वेधले! फोकोमेलिया ही जन्मजात विकृती हात किंवा पाय पूर्ण विकसित न होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे अवयव लहान, अशक्त किंवा अपूर्ण राहतात. समाज अशा मर्यादांकडे दुर्बलतेच्या नजरेने पाहतो, पण शितलदेवीच्या कुटुंबाने तिला कधीही दिव्यांग समजले नाही.१० जानेवारी २००७ रोजी जन्मलेल्या शितलदेवीने लहानपणापासूनच जगाच्या दृ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।