पवित्र रमजान। ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ शयछआनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे. पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात .या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून ये...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।