11 में 1888 रोजी जोतिराव फुले महात्मा जोतिराव फुले झाले . जनतेने सभा भरवून फुलेंना महात्मा ही पदवी बहाल केली. जनतेने सभा भरवून महात्मा ही पदवी बहाल केलेले एकमेव कृतिशील समाजसुधारक व विचारवंत आहेत. अज्ञानाच्या अंधकारात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी जीवनभर ज्यांनी कार्य केलं. अस्पृश्यतेच्या विरोधात कृतिशील आंदोलन उभं केलं. स्वतः च्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. विधवा पुनर्वीवाह असेल किंवा आंतरजातीय विवाह असतील असे जाती अंताचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. चार भिंती मध्ये बंदिस्त असलेल्या महिलांना मुक्त श्वास घेण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शोधा बरोबरच पहिली शिवजयंती साजरी करून महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला.शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झाली हे शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातुन दाखवून दिले. 1882 मध्ये हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावं ही मागणी केली अशी मागणी करणारे जोतिराव फुले हे पहिले समाजसुधारक ठरतात. आपल्या साहित्यामध्ये बळीराजाचा, खंडोबाचा, हिरण्यकश्यपु, बुद्ध, तसेच शूरवी...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।