भारतातील असे कोणते लोहमार्ग स्टेशन आहे , जेथे एकाच बाकावर बसलेली दोन माणसे दोन वेगवेगळ्या राज्यात बसलेली असतात ? देशातील सर्वात अद्वितीय लोहमार्ग स्थानक जेथे एकच बाक दोन राज्यात विभागले गेले आहे . ही कथा आहे एका अशा लोहमार्ग स्थानकाची , ज्याचा एक भाग महाराष्ट्रात आहे व दुसरा गुजरातमध्ये . दोन राज्यांच्या वेगवेगळ्या हद्दीत वसलेल्या या स्थानकामध्ये असं काय विशेष असेल , याची आपण कल्पनाही करू शकत नाही . वास्तविक हे असं एकमेव रेल्वे स्थानक आहे , जे गुजरात - महाराष्ट्र सीमेला स्पर्श करते . स्थानकात एक बाक आहे , ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहेत . या बाकावर बसलेल्यांनी आपण कोणत्या राज्यात बसलो आहोत , हे लक्षात ठेवले पाहिजे . येथे तिकीट खिडकी महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये स्थानकप्रमुख बसतात . एवढेच नाही , तर गाड्यांच्या घोषणा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये होतात . या स्थ...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।