साक्षरता दिवस:- दरवर्षी जागतिक साक्षरता दिनाची विशेष थीम असते. गेल्या वर्षी, साक्षरता दिवस 2022 ची थीम 'साक्षरता शिकण्याच्या जागा बदलणे' होती. या वर्षी, साक्षरता दिवस 2023 ची थीम 'संक्रमणात असलेल्या जगासाठी साक्षरतेला प्रोत्साहन देणे: शाश्वत आणि शांततापूर्ण समाजांसाठी पाया तयार करणे' आहे. जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला. देशाच्या विकासासाठी अधिकाधिक नागरिकांनी साक्षर होणे आवश्यक आहे. साक्षरता प्रगती आणि विकासाचा घटक बनली आहे. ज्या व्यक्तिला लिहिता-वाचता येते ती साक्षर असते. ज्याला 'अ,...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।