हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन अवघ्या महाराष्ट्राचे दैवत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होतो. शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा पासून हा सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. युगपुरुष,रयतेचा राजा, स्वराज्य निर्मिती करणारे शिवराय हे संपूर्ण देशासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श आणि प्रजादक्ष राजा मानले गेले आहेत.अशा या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई शहाज...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।