“आ” म्हणजे आकाशाएवढं प्रेम…“ई” म्हणजे ईश्वर…म्हणूनच म्हणतात, प्रत्येकाला ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून ईश्वराने आईची निर्मिती केली. आई मात्र लेकराच्या एका हाकेसाठी जगाच्या टोकापर्यंत धावते. आई म्हणजे दुधावरची साय असते. जशी साय दुधाचं सौंदर्य वाढवते, तशी आई घराचं सौंदर्य वाढवते. जशी साय गोड, मऊ आणि शुद्ध असते, तशीच आईची माया निर्मळ आणि निस्वार्थ असते. साय काढली तर दूध अपूर्ण वाटतं; तशी आई नसली तर आयुष्य अपूर्ण वाटतं. आई ही लेकराच्या आयुष्याची पहिली गुरू असते. ती चालायला शिकवते, बोलायला शिकवते, जगायला शिकवते. तिच्या अंगाई त प्रेम असते तर तिच्या गोष्टींमध्ये संस्कार दडलेले असतात. आईच्या कुशीतच लेकराला पहिल्यांदा सुरक्षिततेची जाणीव होते. लहान लेकरू रात्री रडते, तेव्हा आईचं हृदय आधी जागं होतं. स्वतःची झोप, भूक, थकवा विसरून ती लेकरासाठी उभी राहते. मुलगा आजारी पडला की रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत जागणारी आई असते. स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवणारी आई असते. आईचं प्रेम हे जगातील सर्वात पवित्र प्रेम असतं. या जगात प्रत्येक नातं क...