पृथ्वीवर वास्तव्य करणारे आम्ही निसर्गाने अगदी मोफत दिलेल्या अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व जाणतो का? म्हणतात की पाणी जेवढे प्याल तेवढे कमीच आहे. परंतु, ही बाब खरोखरच पूर्णपणे सत्य आहे का, असे विचारले तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील आरोग्यास घातक ठरू शकते. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे केव्हाही धोकादायकच आणि पाणीदेखील त्याला अपवाद नाही. पाणी कार्बोहायड्रेट्स, प्रोटिनसारखे पोषणाचे काम करत असते. जिवांना ज्या वस्तूची ज्या अनुपातात गरज असते निसर्गाने ते तत्त्वही त्याचा अनुपातात उपलब्ध करून दिले आहे. परंतु, सध्याचा विचार करता पाणी आणि वायू या दोन्ही गोष्टींबाबत गंभीर संकट निर्माण झाले असेल तर आम्ही नक्कीच कुठे ना कुठे चूक केली हे समजून घेण्याची गरज आहे. पाणी हा तरल पदार्थ आहे जो ठोस आणि वायू स्वरूपातही उपलब्ध आहे. पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानवासह भूतलावर असलेल्या सर्वच प्राण्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, असे असले तरी पिण्याचे स्वच्छ पाणी खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सुरक्षित पाण्याचा अभाव म्ह...
"बालस्नेही"!! मनोज रामचंद्र चौरपगार अमरावती महाराष्ट्र।