मुख्य सामग्रीवर वगळा

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती आपले नाव पहा..

TAIT-2025 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी निवड याद्या जाहीर! पाहण्यासाठी लिंक


https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx


. २७/०८/२०२६

प्रेस नोट

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.

. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले त्यातील उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत.

मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०८/२०२६ या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.

. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे.

. समांतर आरक्षणातील माजी सैनिक (१५ %) अंशकालीन (१०%) याप्रमाणे जाहिरातीत पदे मंजूर आहेत. त्याप्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने २७६० पदे व १७६० पदे रिक्त राहिली आहेत, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १४०८ पदे रिक्त राहिली आहेत.

. सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने Converted Round घेऊन भरण्यात येणार आहेत.

मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.

. उमेदवारांना https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे.

. सध्या उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात येईल.

. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे/मागणी इ. बाबी साठी राज्यस्तरावर "तक्रार निवारण व दुरुस्ती समिती" स्थापन करण्यात आली आहे. edupavitra२०२५grcc@gmail.com या ईमेलवर दिनांक ०६/०९/२०२६ अखेर पर्यंत पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.

. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.