मुख्य सामग्रीवर वगळा

Republic day

26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होतीराष्ट्रीय सण उत्सव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन दिवस पटकन उभे राहतात. ते म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे. त्याच पद्धतीने आपण 26 जानेवारी हा दिवस देखील एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. .... परंतु या स्वतंत्र झालेल्या भारताला एक राष्ट्र म्हणून किंवा लोकांच्या कल्याणासाठी यापुढे देशाची राज्यव्यवस्था कशी असावी? आपला स्वतंत्र भारत देश कोणते नियमाने कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा अगदी आनंदाने उपभोग घेणार आहे? या सर्वांसाठी काही एक नियम बनवणे आवश्यक होते. या कामासाठीच घटना समिती स्थापन करण्यात आली.


भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी घटना समिती नेमली होती. त्या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. या समितीत एकूण  318 सदस्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीत इतर राष्ट्रांच्या अनेक राज्य घटनांचा अभ्यास करून, याच बरोबर भारतीय समाज रचना या सर्वांचा सांगोपांग विचार करून देशासाठी एक मजबूत संविधान बनवले..१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे २४ जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या नावाच्या घोषणेने सुरू होतो. मात्र यावेळी त्याची सुरुवात २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून झाली आहे. आणि २५ जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला जातो.

यादरम्यान राजपथावर परेड काढली जाते. २७ जानेवारी रोजी, पंतप्रधान परेडमध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधतात. आणि २९ जानेवारी रोजी रायसीना हिल्सवर बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम आयोजित केला आहे. यादरम्यान तिन्ही सेवांचे बँड शानदार सुरांसह मार्चपास्ट करतात. यासह प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपतो.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

#तारे जमी पर -

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.