संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होतीराष्ट्रीय सण उत्सव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन दिवस पटकन उभे राहतात. ते म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे. त्याच पद्धतीने आपण 26 जानेवारी हा दिवस देखील एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. .... परंतु या स्वतंत्र झालेल्या भारताला एक राष्ट्र म्हणून किंवा लोकांच्या कल्याणासाठी यापुढे देशाची राज्यव्यवस्था कशी असावी? आपला स्वतंत्र भारत देश कोणते नियमाने कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा अगदी आनंदाने उपभोग घेणार आहे? या सर्वांसाठी काही एक नियम बनवणे आवश्यक होते. या कामासाठीच घटना समिती स्थापन करण्यात आली.
भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी घटना समिती नेमली होती. त्या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. या समितीत एकूण 318 सदस्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीत इतर राष्ट्रांच्या अनेक राज्य घटनांचा अभ्यास करून, याच बरोबर भारतीय समाज रचना या सर्वांचा सांगोपांग विचार करून देशासाठी एक मजबूत संविधान बनवले..१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे २४ जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या नावाच्या घोषणेने सुरू होतो. मात्र यावेळी त्याची सुरुवात २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून झाली आहे. आणि २५ जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला जातो.
यादरम्यान राजपथावर परेड काढली जाते. २७ जानेवारी रोजी, पंतप्रधान परेडमध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधतात. आणि २९ जानेवारी रोजी रायसीना हिल्सवर बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम आयोजित केला आहे. यादरम्यान तिन्ही सेवांचे बँड शानदार सुरांसह मार्चपास्ट करतात. यासह प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपतो.
Happy republic day
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाGo
उत्तर द्याहटवाGreat 👍
उत्तर द्याहटवा