संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे,
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे.
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला. स्त्रीवाद किंवा फेमेनिझम हा मूळ फ्रेंच शब्द.
मुळात, नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या. आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे.
स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman ' या पुस्तकातून. सन 1972 मधे तिने अतिशय स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करुनच केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते.' मुळात 1792 सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते.
दुसरे महत्त्वाचे नाव आहे ते एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन. यांनी पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना केली. याशिवाय, स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून मरियन हाईनिश या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला. तर, केट शेफर्ड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला. १८९३ साली न्यूझिलंडमधे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले. ब्रिटनमधे, एमिलिन पॅन्खर्स्ट हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली. कॅरोलिन एगान हे नाव तर प्रत्येक स्त्रिने लक्षात ठेवावे, असे आहे. कारण, मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची ती पहिली पुरस्कर्ती.
दि. . 8 मार्च 1857 रोजी, न्युयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी जो निषेध नोंदविला होता, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, परंतु, ती निव्वळ कपोलकल्पित कथाच असल्याचे आता आढळून आले आहे.
त्यामुळे, दि. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्युयॉर्क येथे, थेरेसा मालकियल यांच्या मार्गदर्शनाखाली ' सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका' यांनी आयोजित केलेला महिला दिन, हा अगदी पहिला महिला दिन होता, असे मानले जाते.
कोपनहेगन, डेन्मार्क येथे सन 1910 मधे, आंतरराष्ट्रीय महिला परिषद घेण्यात आली. वार्षिक महिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याबाबत एक ठराव मांडण्यात आला, मात्र, या परिषदेत कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही.परिषदेसाठी जमलेल्या प्रतिनिधींनी मतदानाच्या अधिकारासह समान अधिकारांचे संवर्धन या संकल्पनेस धोरणात्मक मान्यता दिली.
नंतरच्या वर्षी 8 मार्च 1911 रोजीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन, ऑस्ट्रीया,डेन्मार्क,जर्मनी आणि स्विट्झर्लंड येथील दहा लाखापेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने विशेष उल्लेखनीय ठरला. एकट्या ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यात जवळपास 300 निदर्शने झाली.पॅरिस परगण्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ व्हिएन्नामधे रिंगस्ट्रास येथे महिलांनी हाती फलक घेऊन संचलन केले. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा,त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळावी अशा मागण्या त्यांनी केल्या तसेच, नोकरीतील लिंगविषमतेचा त्यांनी निषेध केला.
त्यानंतर, अमेरिकेत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
रशियात तत्कालिन वापरात असलेल्या ज्युलियन कॅलेंडरनुसार, सन 1913 मधे रशियन महिलांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महिला दिन साजरा केला.
8 मार्च..
तर, सन 1914 मधे 8 मार्चला रविवार होता. या कारणाने कदाचित, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला आयोजित करण्यात आला असावा आणि नंतर ती प्रथाच पडून गेली..
दि. 8 मार्च 1917 या दिवसाचे मात्र, विशेष महत्त्व आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरमधील, दि. 8 मार्च 1917 रोजी, पॅट्रॉग्राड या रशियन साम्राज्याच्या राजधानीत, वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी संपूर्ण शहरभर निदर्शने केली. ही रशियन राज्यक्रांतीची सुरुवात मानली जाते. सेंट पिट्सबर्ग मधील महिला ' ब्रेड व शांतता' या मागणीसाठी संपावर गेल्या. त्यांनी पहिले महायुद्ध समाप्त करण्याची, रशियातील अन्न तूटवडा संपुष्टात आणण्याची तसेच झारशाहीचा अंत करण्याची मागणी केली.लिओन ट्रॉटस्कीने लिहिले आहे की, ' 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता. महिलांच्या बैठका, कारवाया यांचा पूर्वअंदाज जरी होता तरी हा महिला दिन रशियन राज्यक्रांतिची नांदी असेल, अशी पुसटशी कल्पना कोणालाही आली नव्हती. या दिवशी, व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, सगळे आदेश झुगारुन अनेक वस्त्रोद्योग कारखान्यातील स्त्री कामगार आपापले काम सोडून कारखान्यातून बाहेर पडल्या, संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी, त्यांनी ठिकठिकाणी प्रतिनिधी पाठविले; त्याची परिणीती सामुदायिक संपात झाली. सर्व स्त्री कामगार लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या. सात दिवसानंतर रशियन सम्राट- दुसरा निकोलस याला पायउतार व्हावे लागले. सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचाअधिकार मिळाले.सतीप्रथा, केशवपन,बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले. त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 तर मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली.
स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळविलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला.
स्त्रिया विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विषयांमधे सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या
सन 1902 मधे रमाबाई रानडे यांनी ' हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब'ची स्थापना केली तर 1904 मधे ' भारत महिला परिषदे'ची स्थापना झाली.या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच, प्रथम, संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्रियांना मतदानाबरोबरच निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या. भारतात 1943 साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.
बाबासाहेबांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता
खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.
स्वातंत्र्यानंतर, 1950 सालापासून भारतीय राज्य घटनेने, स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी सन 1975 हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतातही साजरे झाले. 8 मार्च हा महिला दिन, जगभरातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतातही साजरा केला जातो.
मेरी वोल्स्टनक्राफ्ट यांच्यापासून सन 1792 मधे सुरू झालेला हा लढा गेली 225 वर्षे चालू आहे. या प्रदीर्घ कालावधीत स्त्रियांना शिक्षणाचा, संपत्तीचा,मतदानाचा, असे वेगवेगळे अधिकार मिळाले. महिला समानाधिकाराची बाब सर्व जगाने मान्य केली आहे. त्यामुळे, आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत,
जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो,
जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
https://www.amazon.in/gp/bestsellers/watches?_encoding=UTF8&linkCode=ib1&tag=balsnehi21-21&linkId=7fd8b113b66d6464b36abd91ac6f9c3b&ref_=ihub_curatedcontent_87dec40c-6b8b-4d9c-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -