@३१ ऑगस्टला यादी आल्यावर काय करायचे?#महाराष्ट्रातील SIR ची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
महाराष्ट्रातील SIR ची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या काळात दावे व हरकती दाखल करता येतील; त्यानंतर त्यांची सुनावणी/निराकरण २९ ऑक्टोबरपर्यंत होईल आणि अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
३१ ऑगस्टला यादी आल्यावर काय करायचे?
1. सर्वप्रथम आपले नाव तपासा
* नाव आहे का?
* नावाची स्पेलिंग बरोबर आहे का?
* वय/जन्मतारीख, फोटो, पत्ता योग्य आहे का?
* मतदार क्रमांक (EPIC) आणि मतदान केंद्र योग्य आहे का?
2. नाव गायब असेल तर घाबरू नका.
प्रारूप यादी म्हणजे अंतिम यादी नाही. नाव वगळले गेले असल्यास ३१ ऑगस्ट–३० सप्टेंबर या कालावधीत दावा करून नाव समाविष्ट करण्याची संधी आहे.
3. नाव चुकीचे असल्यास दुरुस्ती मागता येईल.
नाव, पत्ता, वय, फोटो इत्यादीमध्ये त्रुटी असल्यास त्यासाठी दावा/हरकत दाखल करता येते.
4. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक मतदाराचे नाव स्वतंत्रपणे तपासा.
विशेषतः वृद्ध व्यक्ती, स्थलांतरित सदस्य किंवा ज्यांचे नाव SIR मध्ये पडताळले गेले नाही अशांची नावे काळजीपूर्वक तपासा.
5. जर 2025 च्या मतदार यादीत नाव होते पण 2026 च्या Draft मध्ये नाही, तर महाराष्ट्र CEO च्या SIR पोर्टलवर अशा मतदारांसाठी स्वतंत्र ASDD (Absent/Shifted/Dead/Duplicate) तपासणीची सुविधाही उपलब्ध आहे.
सर्वात महत्त्वाचे
३१ ऑगस्टला यादी पाहिल्यानंतर नाव नसल्यास “आता काही करता येणार नाही” असे अजिबात नाही. उलट त्या दिवसापासून दावा दाखल करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी सुरू होतो.
प्रारूप यादी ३१ ऑगस्ट २०२६, दावे-हरकती ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर, सुनावणी/निराकरण २९ ऑक्टोबर पर्यंत, आणि अंतिम यादी ४ नोव्हेंबर २०२६.
३१ ऑगस्ट हा घाबरण्याचा दिवस नाही, तर नाव दुरुस्त करण्याची संधी सुरू होण्याचा दिवस आहे.
३१ ऑगस्टला यादी आल्यावर नेमके काय करायचे?
1. सर्वात आधी यादी कुठे पहाल?
• *ceo.maharashtra.gov.in*
- महाराष्ट्र CEO ची SIR पोर्टल
• *voters.eci.gov.in*
तुमच्या भागातील BLO कडे लागलेली यादी
2. काय तपासायचे - ही 5 मुद्द्यांची चेकलिस्ट • नाव यादीत आहे का?
• स्पेलिंग, वडिलांचे/पतीचे नाव बरोबर आहे का?
• वय / जन्मतारीख, लिंग बरोबर आहे का?
• फोटो आणि पत्ता बरोबर आहे का?
• EPIC नंबर आणि मतदान केंद्र बरोबर आहे का?
3. नाव नसेल तर काय करायचे?
ही प्रारूप यादी आहे, अंतिम नाही. त्यामुळे "आता काही करता येणार नाही" असे अजिबात नाही.
तुम्हाला ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात दावा दाखल करता येईल.
• नवीन नाव नोंदणीसाठी / वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी: नमुना क्रमांक 6 (Form 6) आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह भरायचा आहे.
• 2025 च्या यादीत होते पण 2026 च्या Draft मध्ये नाही?
अशांसाठी महाराष्ट्र CEO च्या SIR पोर्टलवर ASDD (Absent / Shifted / Dead / Duplicate) ची स्वतंत्र तपासणी सुविधा असेल. तिथे कारण समजेल - तुम्ही अनुपस्थित, स्थलांतरित, दुबार म्हणून दाखवले आहात का.
4. नावात चूक असेल तर?
नाव, पत्ता, वय, फोटो यात काहीही चूक असेल तर दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक 8 (Form 8) भरता येईल.
5. कुटुंबासाठी काय करायचे?
तुमचे एकट्याचे नाही, घरातील सर्वांचे तपासा.
विशेषतः:
• वृद्ध व्यक्ती
• शिक्षण/नोकरीसाठी बाहेर गेलेले सदस्य
• ज्यांनी SIR फॉर्म भरला नव्हता / BLO कडे पडताळणी झाली नव्हती
लक्षात ठेवायच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी
1. कागदपत्रे तयार ठेवा: आधार, जन्म पुरावा, पत्त्याचा पुरावा, 2025 च्या यादीतील तपशीलाचा स्क्रीनशॉट/फोटो, आणि एक पासपोर्ट फोटो.
2. आलेल्या दावे व हरकतींवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर दरम्यान सुनावणी होईल, आणि मगच ४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी येईल.
थोडक्यात - ३१ ऑगस्ट यादी पाहा, चूक सापडली तर Form 6 नविन नाव नोंदणी / Form 8 नावात पत्यात किंवा इतर बदल द्वारे दाखल करा. हीच तुमची मतदार यादीतील हक्काची जागा टिकवण्याची खिडकी आहे.@बालस्नेही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -