मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP 2020) अंतर्गत FLN व पूरक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी कायमस्वरूपी देण्याबाबत आणि शाळांमधील अनुपयुक्त / निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत.


महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र. क्र. २६६ (ई-१८३९७९९)/एसडी-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १७ सप्टेंबर, २०२६

विषय :

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP 2020) अंतर्गत FLN व पूरक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी कायमस्वरूपी देण्याबाबत आणि शाळांमधील अनुपयुक्त / निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत.

संदर्भ :

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण११२५/प्र.क्र.२५१/२५/एसएम-१, दि. १६.०४.२०२५.
२. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP 2020).
३. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. विअप्र २०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियमन, भाग-२, दि. १७.०४.२०१५.
४. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. मातंस/नस्ती ०७/प्र. क्र. ८९/३९, दि. ०१.०८.२०११.
५. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अधिसूचना क्र. पीआरई २०१०/प्र. क्र. २१२ (बी)/पीई-१, दि. ११.१०.२०११.
६. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (दि. २७.०८.२००९).

प्रस्तावना :

१) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ ची राज्यात एप्रिल २०१० पासून अंमलबजावणी सुरू आहे. याद्वारे ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला असून, आवश्यक मूलभूत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

२) या धोरणाचा भाग म्हणून २२ जून, २०१५ च्या शासन निर्णयानुसार “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” कार्यक्रम सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांची भाषा (मराठी/इंग्रजी/उर्दू), गणित व इतर विषयांतील संपादणूक पातळी वाढवण्यासाठी समग्र शिक्षा, CSR व विविध माध्यमांतून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) संच, जादुई पिटारा, कार्यपुस्तिका व पूरक शैक्षणिक साहित्य शाळांना पुरवण्यात आले आहे.

३) शिक्षण विभागाच्या भेटीदरम्यान असे निदर्शनास आले आहे की, शाळांमध्ये उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर करताना विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार साहित्य तुटणे, मोडणे, हरवणे किंवा कालांतराने जीर्ण होणे या नैसर्गिक बाबी घडतात.

४) निपुण भारत (FLN) व NEP २०२० वर आधारित सुधारित राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवीन पाठ्यपुस्तके विकसित केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, पूर्वीचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वयंअध्ययनासाठी (Self-Learning) कायमस्वरूपी घरी वापरण्यास देणे शैक्षणिकदृष्ट्या इष्ट ठरेल.

५) वरील बाबींचा विचार करून, सन २०१५-१६ पासून शाळांना उपलब्ध झालेल्या शैक्षणिक साहित्याचे “विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापरासाठी वितरण” आणि “जीर्ण / कालबाह्य साहित्याचे निर्लेखन” याकरिता एकत्रित कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

शासन परिपत्रक

कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना :

१. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना प्राप्त झालेल्या टिकाऊ शैक्षणिक साहित्याचे आयुष्यमान सर्वसाधारणपणे ३ वर्षांचे राहील. साहित्य प्राप्त झाल्यापासून ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची उपयुक्तता तपासून निर्लेखनाची पात्रता निश्चित करावी.

त्यानुसार माहे मार्च, २०२३ पूर्वीचे प्राप्त भाषा, गणित, विज्ञान विषयाचे पूरक शैक्षणिक साहित्य निर्लेखित करून त्यामधील वापरण्यायोग्य साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी घरी उपलब्ध करून द्यावे.

हे साहित्य शैक्षणिक वर्षाच्या शेवटी परत जमा करून न घेता विद्यार्थ्यांकडेच राहील.

विद्यार्थ्यांनी घरी या साहित्याचा दैनंदिन सराव करावा, यासाठी वर्गशिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन करावे.

२. संदर्भ क्र. १ येथील दि. १६.०४.२०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार गठित “शाळा व्यवस्थापन समिती” (SMC) हीच शाळा स्तरावर “निर्लेखन समिती” म्हणून कामकाज करेल व साहित्याचे निर्लेखन करेल.

३. निर्लेखित साहित्याची विल्हेवाट लावून त्याची नोंद साठा नोंदवहीत (Stock Register) घ्यावी. निरुपयोगी साहित्य शाळेत साठवून ठेवू नये.

४. जे साहित्य निर्लेखित करण्यात आलेले नाही, त्याचा दरवर्षी जून महिन्यात आढावा घेऊन, उचित कार्यवाही करण्यात यावी.

तरी, वरील कार्यपद्धतीप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.


शासन परिपत्रकाची अधिकृत नोंद

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक : 202609171147320349 असा आहे.

हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अनिरुद्ध कुलकर्णी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत — माहितीसाठी व आवश्यक त्या कार्यवाहीस्तव :

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
३. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे.
४. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
८. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे.
९. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.
१०. निवडनस्ती (एसडी-१).


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.