मुख्य सामग्रीवर वगळा

@उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी (FLNAT) पुढे ढकलण्याबाबत.

महाराष्ट्र शासन.

शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य
१७, आंबेडकर मार्ग, पुणे-४११००१.

दूरध्वनी क्रमांक : ०२०/२६९६७०२६/२६९२३५४५
E-mail Id:- directoradult@gmail.com

जा. क्र. सिसयो/योजना-३/नभासा/स्वस/२०२६-२७/४०४
दिनांक :- १६/०९/२०२६

प्रति,
१. शिक्षणाधिकारी (योजना), सर्व जिल्हे, महाराष्ट्र राज्य.
२. शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई.

विषय :-

उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी (FLNAT) पुढे ढकलण्याबाबत.

संदर्भ :-

१. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग (प्रौढ शिक्षण ब्युरो), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. F. No. 14-1/2023-AE-4, दिनांक 31 जुलै 2026.
२. या कार्यालयाचे पत्र दि. 21/08/2026.
३. शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे पत्र दि. 01/09/2026.

महोदय,

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले आहे की, उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी (FLNAT) दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वा. वेळेत ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार होती.

सदर परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आवश्यक पूर्वतयारी, परीक्षा केंद्र निश्चिती, परीक्षार्थी नोंदणी/यादी, भौतिक व प्रशासकीय व्यवस्था तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय करण्याबाबत आवश्यक सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत.

मात्र, काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेली सदर FLNAT परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी सदर परीक्षेच्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवावी.

तसेच, परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्रांशी संबंधित अधिकारी/कर्मचारी व इतर संबंधित घटकांना याबाबत योग्य ती माहिती देऊन, सदर परीक्षेबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सदर FLNAT परीक्षेची सुधारित तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर ती स्वतंत्रपणे यथावकाश कळविण्यात येईल. सुधारित तारीख व वेळ प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील.

तरी, सदर बाबीची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.

आपला विश्वासू,

(कृष्णकुमार पाटील)
शिक्षण संचालक,
शिक्षण संचालनालय (योजना) तथा
सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण,
महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहितीसाठी सविनय सादर.

१. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष नियामक परिषद, उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम, सिंधुदुर्ग.

२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष कार्यकारी समिती, उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम directoradult@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.