शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असलेला ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष’ (Employees Master Database-EMDb) अद्ययावत करणे बाबत..
महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई-400032.
शासन परिपत्रक क्रमांक : असांसं 1326/प्र.क्र.132/कार्यासन 1417
दिनांक : 02 सप्टेंबर, 2026
शासन परिपत्रक :
अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षीप्रमाणे अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी) तसेच तदर्थ तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.
त्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असलेला ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष’ (Employees Master Database-EMDb) अद्ययावत करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने दि. 1 जुलै, 2026 या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ I.D., कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, जन्मदिनांक, लिंग, पदनाम, सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, निवृत्तीचा दिनांक, सेवेत रुजू झाल्याचे पदनाम, भविष्य निर्वाह निधी / DCPS खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, कर्मचाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक, कर्मचाऱ्याचा Email I.D., सामाजिक प्रवर्ग, कर्मचाऱ्याची जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांगत्व इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती तसेच, लागू असल्यास, सध्याचे पदनाम, सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक, आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे.तसेच, जुलै 2026 या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशीलवार माहितीही गोळा करण्यात येणार आहे. माहिती नोंदणीकरिता अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाकडून संगणकीय ऑनलाइन आज्ञावली तसेच लॉग-इन आयडी व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे व आज्ञावली वापरण्यासंबंधीचे सूचनासंच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येतील
‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2026’ (Employees Master Database-EMDb 2026) विहित वेळेत अद्ययावत करण्यासाठी व त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे आहरण व संवितरण अधिकारी यांनी पुढील वेळापत्रक व सूचना विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी.
वेळापत्रक
तपशील — कालावधी
1. Login Id व Password आयुक्तालयाने उपलब्ध करून देणे :
दि. 02 सप्टेंबर, 2026 ते दि. 15 सप्टेंबर, 2026.
2. आहरण व संवितरण अधिकाऱ्याने माहिती सादर करणे व पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे :
दि. 15 सप्टेंबर, 2026 ते दि. 30 नोव्हेंबर, 2026.
3. आहरण व संवितरण अधिकाऱ्याने माहितीमध्ये आढळलेल्या त्रुटींचे निवारण करून माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे :
दि. 01 डिसेंबर, 2026 ते दि. 28 फेब्रुवारी, 2027.
2. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी सूचना
अ) राज्य शासकीय कार्यालयांतील प्रत्येक आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित प्रादेशिक / जिल्हा सांख्यिकी कार्यालयांकडून ऑनलाइन आज्ञावलीकरिता लॉग-इन आय.डी. व पासवर्ड उपलब्ध करून घ्यावेत. सदर माहितीकोषासाठी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती दि. 1 जुलै, 2026 या संदर्भ दिनांकास अनुसरून अद्ययावत करण्यासाठी Employee Master Database-2025 मधील त्यांच्या कार्यालयाने भरलेली माहिती आधारभूत म्हणून उपलब्ध करून देण्यात येईल. माहिती भरण्याचा सूचनासंच ऑनलाइन आज्ञावलीमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
आ) राज्य शासनाच्या कार्यालयांची आहरण व संवितरण अधिकारीनिहाय माहिती ऑनलाइन स्वरूपात संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचा समावेश आधारभूत माहितीमध्ये असून ते दि. 1 जुलै, 2026 या संदर्भ दिनांकास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येत आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संगणकीय ऑनलाइन आज्ञावलीमध्ये अद्ययावत करावयाची आहे.याशिवाय, नवीन कर्मचाऱ्यांची (जसे बदली होऊन आलेले अथवा नवीन नियुक्ती झालेले इत्यादी) माहिती आणि आधारभूत माहितीमध्ये समाविष्ट नसलेल्या, तथापि दि. 1 जुलै, 2026 रोजी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती देखील या आयुक्तालयाने दिलेल्या ऑनलाइन आज्ञावलीमध्ये भरावयाची आहे.
इ) जुलै महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, ते जर दि. 1 जुलै, 2026 रोजी राज्य शासनाचे कर्मचारी असतील, तर जुलै महिन्यात त्यांच्यावर शासनाचा निधी खर्च पडला असल्याने अशा कर्मचाऱ्यांचा देखील समावेश माहितीकोषात करावा. आज्ञावलीमध्ये माहिती नोंदणी करताना कर्मचाऱ्यांच्या सेवाभिलेखानुसार माहिती नोंदविण्यात येत आहे, याची खातरजमा करावी.
ई) उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन आज्ञावलीच्या सूचनासंचात तसेच यूजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य रीतीने कर्मचाऱ्यांची माहिती नोंदणी करावयाची आहे. माहिती नोंदणी करताना कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदणी करण्याची दक्षता संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे
अशाप्रकारे ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्यानंतर माहिती प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी कार्यालय / प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
माहे नोव्हेंबर, 2026 च्या वेतन देयकासोबत (November, 2026 to be paid in December, 2026) अशा प्रकारचे प्रमाणपत्र जोडले नसल्यास माहे नोव्हेंबर, 2026 ची वेतन देयके कोषागार कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालयात स्वीकारली किंवा पारित केली जाणार नाहीत. प्रमाणपत्राशिवाय कोषागार कार्यालयांनी वेतन देयके पारित करू नयेत.
उ) शासकीय कार्यालयांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीची तपासणी संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालये करतात व प्रादेशिक कार्यालयांकडून संनियंत्रण करण्यात येते. संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सदर माहितीमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी दिनांक 1 डिसेंबर, 2026 ते 28 फेब्रुवारी, 2027 हा कालावधी देण्यात येत आहे.
संबंधित कार्यालयांकडून त्रुटींचे निराकरण झाल्यानंतर लगेच माहिती तपासल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल. हे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी, 2027 च्या वेतन देयकासोबत (February, 2027 to be paid in March, 2027) जोडून वेतन देयके कोषागारात सादर करावयाची आहेत.
अशा प्रकारचे माहिती तपासल्याचे प्रमाणपत्र फेब्रुवारी, 2027 च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयके कोषागारात स्वीकारण्यात येणार नाहीत. प्रमाणपत्राशिवाय कोषागार कार्यालयांनी वेतन देयके पारित करू नयेत.
ऊ) ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनीसुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाइन आज्ञावलीद्वारे नोंदणी करून जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे दि. 15 सप्टेंबर, 2026 ते दि. 30 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत सादर करावी.
ए) शासन परिपत्रक क्र. समय 2020/प्र. क्र.35/18(र.व.का), दिनांक 5 जून 2020 मधील सूचना विचारात घेता, शासकीय कामकाजासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालये / प्रादेशिक कार्यालये यांच्याकडून ई-मेलद्वारे प्राप्त करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची प्रत ग्राह्य धरण्यात येईल.
3. ऑनलाइन संगणकीय आज्ञावलीमध्ये माहिती भरण्यात काही अडचणी आल्यास संबंधितांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालये / प्रादेशिक कार्यालये यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत खुलासा प्राप्त करून घ्यावा. सर्व कार्यालयांनी कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होण्याकरिता लॉग-इन आय.डी. व पासवर्ड वेळापत्रकानुसार प्राप्त करून घ्यावे.
4. सर्व कोषागारे / उपकोषागारे अधिकाऱ्यांनी माहितीकोषाच्या कामी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयास संपूर्ण सहकार्य देऊन माहितीकोषाबाबत अपेक्षित कार्यवाही पार पाडावी.
माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, 2026 च्या वेतन देयकासोबत व माहितीकोषातील माहिती बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी, 2027 च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने न स्वीकारता संबंधित कार्यालयांना ती योग्य त्या पूर्ततेसाठी परत पाठवावीत.
मात्र, जे राज्य शासकीय कर्मचारी नाहीत, अशांच्या वेतन देयकांबाबत ही कार्यवाही लागू नाही. (उदा. मा. राज्यपाल, आमदार, मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य इ.
5. कोषागारे / उपकोषागारे अधिकारी यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात
6. सदर परिपत्रक वित्त विभागाच्या नस्ती क्र. ई-1798432, दिनांक 01/09/2026 अन्वये नियोजन विभागास दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे
7. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक 202609021443290416 असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(गीतांजली बाहेरवस्कर)
सह सचिव, नियोजन विभाग,
महाराष्ट्र शासन.
प्रति :
1) मा. विरोधी पक्ष नेते, विधान सभा / विधान परिषद, विधान भवन, मुंबई-32.
2) मा. राज्यपालांचे सचिव, लोकभवन, मुंबई.
3) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-32.
4) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-32.
5) सर्व मंत्रालयीन विभाग, यांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या अधिनस्त सर्व विभाग प्रमुख / सर्व कार्यालय प्रमुख, सर्व संचालनालये, आयुक्तालये यांना या अनुषंगाने कळविण्यात यावे.
6) प्रधान सचिव, वित्त विभाग / कोषा प्र-5, मंत्रालय, मुंबई-32.
7) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
8) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
9) प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त कार्यालय, मुंबई-32.
10) प्रबंधक, मूळ / ॲपिलेट शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
11) जिल्हाधिकारी (सर्व).
12) आयुक्त, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, वांद्रे (पूर्व), मुंबई-51.
13) संचालक, शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय, मुंबई.
14) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
15) सर्व प्रादेशिक सहआयुक्त, प्रादेशिक कार्यालय, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय.
16) सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर.
17) अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई-32.
18) अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई-51.
19) सर्व कोषागार / उपकोषागार अधिकारी.
20) सर्व उपआयुक्त, जिल्हा सांख्यिकी कार्यालये (सर्व), अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय.
21) निवड नस्ती (का. 1417), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-32.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -