उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा फेब्रु–मार्च २०२७ लेखी परीक्षा आयोजनाबाबत...प्रकटण
विषय – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा फेब्रु–मार्च २०२७ लेखी परीक्षा आयोजनाबाबत...
प्रकटण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रु–मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
| अ.क्र. | तपशील | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा कालावधी | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा कालावधी |
|---|---|---|---|
| १ | लेखी परीक्षा | सोमवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२७ ते मंगळवार, दि. १६ मार्च २०२७ | सोमवार, दि. १५ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, दि. ११ मार्च २०२७ |
| २ | प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन | बुधवार, दि. २० जानेवारी २०२७ ते शनिवार, दि. ०६ फेब्रुवारी २०२७ | गुरुवार, दि. २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, दि. १३ फेब्रुवारी २०२७ |
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी–मार्च २०२७ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात येत आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षेचे विषयानिहाय सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
उपरोक्त बाबी सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
दिनांक : १७/०९/२०२६
(डॉ. दीपक माळी)
सचिव,
राज्यमंडळ, पुणे 4
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -