शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मधील शिक्षक पदभरतीच्यावेळी आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या प्रवर्गातून निवडीसाठी विचारात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१
दूरध्वनी क्र.: 020-26120441
ई-मेल : educom-mah@mah.gov.in
ईमेल/टपालाद्वारे
जा.क्र.मराप्प/पवित्र-पर्दासर्वो.न्या-अनु/२०२६/
दि. दिनांकित स्वाक्षरी
प्रति,
१. मा. आयुक्त, महानगरपालिका - बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर, मालेगाव जिल्हा नाशिक.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद - यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया, रायगड, वर्धा, रत्नागिरी, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, जळगाव, अकोला, धुळे.
३. प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी, महानगरपालिका - बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर, मालेगाव जिल्हा नाशिक.
४. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जिल्हा परिषद - यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया, रायगड, वर्धा, रत्नागिरी, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, जळगाव, अकोला, धुळे.
५. प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी, नगरपालिका - विटा जिल्हा सांगली, खामगाव जिल्हा बुलढाणा.
विषय :- मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिकेतील निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत.
संदर्भ :-
१. मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्र. १४५१७-१४५३९-२०२५ मधील निर्णय दिनांक २३/०३/२०२६.
२. सम क्रमांकाचे पत्र दिनांक ०८/०८/२०२६
३. याचिकादार यांना पाठविलेला ई-मेल दिनांक १५/०८/२०२६ व पत्र दिनांक १७/०८/२०२६
४. याचिकादार यांना पाठविलेला ई-मेल व पत्र दिनांक २०/०८/२०२६
५. याचिकादार उमेदवार यांचे प्राप्त ई-मेल
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मधील शिक्षक पदभरतीच्यावेळी आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या प्रवर्गातून निवडीसाठी विचारात घेण्यात आले आहे. त्याविरोधात मा. उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल केली होती, सदर याचिका नाकारण्यात आल्यामुळे आपण मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भाधिन विशेष अनुज्ञा याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेत निर्णय देताना मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयातील Conclusion मधील परिच्छेद ३३ मध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे.
33. For the foregoing reason, impugned judgement dated 14.02.2025, is quashed and set aside. The respondents shall include in the merit list, those appellants who have secured marks higher than the last selected candidate in the general category.
मा. न्यायालयाचे आदेशानुसार मुलाखतीशिवाय या निवड प्रकारातील निवड यादीमध्ये खुला प्रवर्ग व संबंधित विषय यांचे कटऑफ गुण तसेच जन्म तारीख याबाबींनुसार उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेवून ज्या क्रमाने निवड याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्याक्रमाने निश्चित होत असलेल्या निवड यादीमध्ये सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांची आपल्या व्यवस्थापनाकडे नियुक्तीसाठी संदर्भ क्र २ अन्वये शिफारस करण्यात आली होती, तथापि उमेदवारांनी केलेली मागणी व खुल्या प्रवर्गाचे कटऑफ याबाबी विचारात घेता यासोबतच्या यादीतील अनुक्रमांक १ ते १७ वर नमूद असलेल्या उमेदवारांना यापूर्वी दिलेल्या शिफारशींमध्ये याद्वारे बदल करण्यात येत आहे.
तसेच संदर्भ क्रमांक ३ व ४ अन्वये विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर केलेल्या उमेदवारांची प्राप्त माहिती तपासून खुल्या प्रवर्गापेक्षा अधिक अथवा समान गुण असल्यास वयाबाबतच्या तरतुदी विचारात घेऊन अनुक्रमांक १८ ते ३२ वर नमूद केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या व्यवस्थापनाकडे निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. (प्रत संलग्न)
कार्यवाही :
सदर यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करताना यापूर्वी या कार्यालयाकडून उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी बाबत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. त्यानुसार पोर्टलवरील उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आपल्यास्तरावर करुन तद्नंतरच उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करावेत.
उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्र पडताळणी/समुपदेशन इ.बाबत आपल्यास्तरावरुन नियुक्ती प्राधिकारी म्हणून उमेदवारांना कळविण्यात यावे, तसेच सदर उमेदवार यांच्या कागदपत्र पडताळणीनंतर प्रत्यक्ष नियुक्ती सन २०२५ मधील चाचणीनुसार सध्या कार्यवाही सुरु आहे त्यांच्या अगोदर यातील पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही करावी, ही विनंती.
( मा. आयुक्त शिक्षण यांचे मान्यतेनुसार )
( महेश चोथे )
सदस्य सचिव पवित्र पोर्टल राज्यस्तर सुकाणू समिती तथा आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
प्रत पुढील आवश्यक त्याकार्यवाहीसाठी :
संबंधित याचिकाकर्ते उमेदवार (सोबत जोडलेल्या यादीमधील)
प्रत माहितीस्तव:
मा. उपसचिव (टिएनटी-१), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२...
@GR
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -