मुख्य सामग्रीवर वगळा

 

भारतातील असे कोणते लोहमार्ग स्टेशन आहे, जेथे एकाच बाकावर बसलेली दोन माणसे दोन वेगवेगळ्या राज्यात बसलेली असतात?








          देशातील सर्वात अद्वितीय लोहमार्ग स्थानक जेथे एकच बाक दोन राज्यात विभागले गेले आहे. ही कथा आहे एका अशा लोहमार्ग स्थानकाची, ज्याचा एक भाग महाराष्ट्रात आहे व दुसरा गुजरातमध्ये. दोन राज्यांच्या वेगवेगळ्या हद्दीत वसलेल्या या स्थानकामध्ये असं काय विशेष असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.                 

          वास्तविक हे असं एकमेव रेल्वे स्थानक आहे, जे गुजरात-महाराष्ट्र सीमेला स्पर्श करते. स्थानकात एक बाक आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहेत.

या बाकावर बसलेल्यांनी आपण कोणत्या राज्यात बसलो आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

         येथे तिकीट खिडकी महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये स्थानकप्रमुख बसतात. एवढेच नाही, तर गाड्यांच्या घोषणा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये होतात. या स्थानकाचे नाव आहे *‘नवापूर’.* 

         नवापूर लोहमार्ग पोलीस ठाणे, उपहारगृह, तिकीट खिडकी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये येते आणि स्थानकप्रमुख, प्रतीक्षा कक्ष, पाण्याची टाकी आणि शौचालय हे गुजरातमधील तापी जिल्ह्यातील उच्छलमध्ये येते. या स्थानकात येणाऱ्या गाड्यांचा एक भाग महाराष्ट्रात आणि दुसरा भाग गुजरातमध्ये असतो. 

          या लोहमार्ग स्थानकाची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दोन्ही राज्यांच्या हद्दीत लागू असलेले भिन्न कायदे होय. गुजरातमध्ये दारूविक्रीवर बंदी आहे, तर महाराष्ट्रात पानमसाला आणि गुटख्यावर. स्थानकाच्या गुजरात भागामध्ये गुटख्याची विक्री करणे हा गुन्हा नाही, परंतु कोणी चुकून ते महाराष्ट्रातील सीमेवर विकून गेले, तर तो गुन्हेगार ठरते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही दारू आणि बिअरची विक्री होऊ शकते, परंतु गुजरातमध्ये यावर बंदी आहे. गुजरातमधील कोणी असे करताना आढळल्यास तो गुन्हेगार ठरतो. बर्‍याच वेळा असे घडते की, दुसर्‍या राज्याच्या सीमेवर गुन्हा केल्यावर गुन्हेगार दुसर्‍या राज्यात प्रवेश करतो. अशा परिस्थितीत पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात डोळेझाक होताना दिसते ....

         नवापूर लोहमार्ग स्थानक पश्चिम विभागाच्या सुरत-भुसावळ लोहमार्गावर आहे. सुरत-भुसावळ हा दुहेरी विद्युत लोहमार्ग आहे. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र व गुजरातमधील व्यापारी घेतात. सुरतमध्ये कापड व हिरे उद्योग,  सूतगिरण्या आहेत. हे स्थानक कापड व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय तेथून जाणाऱ्या गाड्यांमध्ये उकई मासे पश्चिम बंगालला जातात. नवापूर लोहमार्ग स्थानकात २४ तासांत एकूण २०० गाड्या जातात. स्वच्छतेसाठी या लोहमार्ग स्थानकास अनेक वेळा बक्षीस देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.