मुख्य सामग्रीवर वगळा

#लोकसंख्येचा विस्फोट

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करताना दरवर्षी एका थीमवर काम केलं जाते. यावर्षी “Rights and Choices are the Answer: Whether baby boom or bust, the solution to shifting fertility rates lies in prioritising all people's reproductive health and rights" अशी थीम आहे.
सध्या भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 37 कोटी एवढी आहे. मुंबई आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावे अपत्य जन्माला आले, तेव्हापासून हा दिवस 'जागतिक लोकसंख्या दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो.लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत. विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या, अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, घडामोडी घडल्या. दोन जागतिक महायुध्दे, वसाहातिक देशांनी मिळविलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुध्द, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध, संशोधन, रशियाचा उदयास्त. भारताला स्वातंत्र्य हय़ा काही प्रतिनिधीक घडामोडी, घटना होत. हय़ाशिवाय 20व्या शतकात झालेली विश्वलोकसंख्येतील प्रचंड वाढ ही विशेष क्रांतिकारी घटना होय. वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी समाजातील भरपूर लोकांना एकत्रितपणे काम करायला लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आखून आणि कृती आयोजित करून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. चर्चासत्रातील चर्चा, शैक्षणिक स्पर्धा, शैक्षणिक माहिती सत्रे, निबंधलेखन स्पर्धा, विविध विषयांवर सार्वजनिक स्पर्धा, पोस्टर वितरण, गाणी, क्रीडाविषयक कार्यक्रम, व्याख्याने आणि कविता, कलात्मक काम, घोषणा, मध्यवर्ती कल्पना आणि संदेश यांचे वितरण, कार्यशाळा, भाषणे, वादविवाद, गोलमेज चर्चा, पत्रकार परिषदा, विविध वृत्तवाहिन्या आणि इतर अनेक माध्यमांतून बातम्यांचे वितरण यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश असतो. लोकसंख्यावाढीच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या आरोग्य संघटना आणि लोकसंख्याविषयक विभाग एकत्रितपणे काम करतात. त्यासाठी परिषदा, संशोधन कार्ये, बैठका, प्रकल्प विश्‍लेषण इत्यादी अनेक कार्यक्रमांची आखणी केली जाते. पृथ्वीची लोकसंख्या २०११ मध्ये ७ अब्ज होती आणि २०५० पर्यंत ९.६ अब्ज होण्याची शक्यता आहे. यामध्ये, चीनपेक्षाही भारताची ‘प्रगती’ वेगाने होत आहे ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे ! या अभूतपूर्व वाढीमुळे फक्त भारतच नाही; संपूर्ण जगापुढेच बकाल शहरीकरण, बेरोजगारी, अपुरे अन्न- पाणी- आरोग्य, प्रदूषण यांसारख्या मुलभूत समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीचा बेबंद आणि असंतुलित वापर पाहता ही वाढ सर्वांनाच जड जाणार आहे.
पर्यायाने आपल्याला काही गोष्टी करता आल्या तर त्यांनी निश्चितच कराव्यात व लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.