मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

#पहाटेची अमर्याद ताकद.

#पहाटेची अमर्याद ताकद

तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.
पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?
“हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन, 
त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,
 आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!
पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?
इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.
SAVERS’
ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.
१) Silence – (ध्यान)
- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!
- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!
- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!
- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!
- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!
- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान! 
२) Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना)
- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!
- स्वतः स्वतःला सुचना देणं,
- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!
- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.
- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.
- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे? 
- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!... 
३) Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)
तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!
- कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.
- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.
- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.
पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.
- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. 
- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.
- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, 
“यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” 
४) Exercise – (व्यायाम)
- शरीरातून आळसाला पळवून  लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!
- शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!
- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.
- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.  
- तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.
- ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा.  शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.
५) Reading – (वाचन)
- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.
- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.
६) Scribing– (लिहिणे.)
*- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.*
- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.
- लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.
- संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.
- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात.
- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,*
- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.
- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.
- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,
-  रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.
- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!
- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.
- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.
ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत.? 
 आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.
कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.. 
काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.

@बाल्सनेही ,

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

#तारे जमी पर -

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...