संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांनी १९२८ मध्ये शोधलेल्या "रमण प्रभाव" (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले.
विज्ञानाच्या तेजस्वी सूर्यप्रकाशात भारताने आपल्या बुद्धिमत्तेच्या दीपस्तंभाने आकाश व्यापले आहे. अंतराळाच्या अथांग गूढतेत भारतीय विज्ञानाने आपल्या कौशल्याने एक नवा तारा प्रज्वलित केला , "मिशन मंगळ"! भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ISROप्रयत्नांनी, अथक परिश्रमांनी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने 2013 मध्ये इतिहास रचला गेला. मंगळयान, हा भारताच्या विज्ञानाच्या कुशीतून जन्मलेला तेजस्वी मोती, अवकाशाच्या गूढतेत नांदणाऱ्या लाल ग्रहाला स्पर्श करू पाहत होता.ही मोहीम म्हणजे केवळ एक यान नव्हे, तर भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची भव्य गगनभरारी होती. संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या होत्या आणि भारताने त्या अपेक्षांपेक्षा अधिक तेजस्वी कामगिरी केली. विज्ञान दिनाच्या निमित्ताने, या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद मोहिमेच्या चंद्रकोरीसारख्या झळाळत्या प्रवासाच आहे.
मिशन मंगळ, भारताच्या विज्ञानाचा सुवर्णक्षण
जसे गगनातील चंद्राला पाहून मानवाच्या जिज्ञासेने उचल खाल्ली, तसेच मंगळ ग्रहाच्या रहस्यमय अस्तित्वाने मानवी बुद्धीला सदैव आकर्षित केले आहे. मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळ यान म्हणजेच "मंगळयान". भारतीय वैज्ञानिकांनी आपल्या कल्पनाशक्तीला पंख लावले आणि पृथ्वीच्या ओटीपोटातून उगवलेले हे यान 5 नोव्हेंबर 2013 रोजी अवकाशाच्या अज्ञात प्रदेशात झेपावले.
24 सप्टेंबर 2014 हा दिवस उजाडला आणि इतिहास घडला. भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवण्याचा मान मिळवला, हा एक अचाट चमत्कार होता. स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या वैज्ञानिक प्रवासातील हा सुवर्ण क्षण होता.
ही मोहीम म्हणजे केवळ एक यान पाठवणे नव्हते, तर हा होता भारताच्या वैज्ञानिक प्रवासाचा तेजस्वी दीपस्तंभ. या मोहिमेच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये होते ,मंगळ ग्रहाभोवती फिरणारे यान विकसित करणे जणू पृथ्वीचा एक प्रतिनिधीच मंगळाच्या अंगणात फेरफटका मारत होता.मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास – त्या लाल वाळवंटासारख्या ग्रहावर जीवनाचे अस्तित्व शक्य आहे का, याचा शोध घेणे. मंगळावरील हवामान आणि भूभागाचा अभ्यास,त्या अनोख्या भूमीचा पृथ्वीशी असलेला नातेसंबंध शोधणे.
अंतराळ मोहिमा अधिक प्रभावी आणि किफायतशीर बनवणे – विज्ञानाची प्रगती ही फक्त संसाधनांवर नव्हे, तर कल्पनाशक्ती आणि नवोन्मेषावर अवलंबून असते.
भारताचे अंतराळ संशोधन म्हणजे एक अद्भुत प्रवास आहे. डॉ. विक्रम साराभाई यांच्या दृष्टिकोनातून उभ्या राहिलेल्या इस्रो या संस्थेने भारताला जागतिक अवकाशशास्त्रात अभूतपूर्व स्थान मिळवून दिले.भारताने पहिला उपग्रह "आर्यभट्ट" 1975 मध्ये अंतराळात पाठवला आणि त्या दिवसापासून भारताची अंतराळसंपत्ती वाढतच गेली. त्या प्रवासात मंगळयानाने संपूर्ण जगाला अचंबित करणारा एक सोनेरी अध्याय लिहिला.प्रक्षेपण यंत्रणा – पीएसएलव्ही-सी25 (PSLV-C25) या शक्तिशाली यानाने मंगळयानाला अंतराळात सोडले.संप्रेषण तंत्रज्ञान – पृथ्वी आणि मंगळ यांना जोडणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रणाली तयार करण्यात आली.
ऊर्जा स्त्रोत – सौर पॅनेल्सच्या मदतीने अखंड ऊर्जा पुरवठा केला गेला.. वैज्ञानिक उपकरणे, मंगळाच्या मृत्तिकेचे आणि वातावरणाचे परीक्षण करण्यासाठी मार्स कलर कॅमेरा, थर्मल इंफ्रारेड स्पेक्ट्रोमीटर, मिथेन सेन्सर यांसारखी उपकरणे वापरण्यात आले,ही मोहीम जगातील सर्वात स्वस्तात पूर्ण झालेली मंगळ मोहीम होती. अवघ्या 450 कोटी रुपयांत, म्हणजे हॉलिवूडच्या "ग्रॅव्हिटी" चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी खर्चात, भारताने मंगळ गाठले!आतापर्यंत अमेरिका, रशिया, युरोप यांना अनेक अपयशांनंतर मंगळ गाठता आले होते. पण भारताने पहिल्याच प्रयत्नात हे कठीण स्वप्न पूर्ण केले. हा एक जागतिक विक्रम होता.ही मोहीम पूर्णतः भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली. ही केवळ एक मोहिम नव्हती, तर भारताच्या आत्मनिर्भरतेचा एक दैदिप्यमान सोहळा होता.
भारत आता मंगळयान-२ मोहिमेसाठी सज्ज होत आहे. भविष्यात भारतीय अंतराळवीरही गगनयान मोहिमेच्या माध्यमातून अवकाशात झेपावतील.चांद्रयान-३ मोहिमेनंतर, आता भारत शुक्राच्या दिशेने मोहीम आखत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि यंत्रमानव तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यात इस्रो नवे संशोधन करणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन हा विज्ञानाच्या गगनभरारीचा सोहळा आहे. मिशन मंगळ ही त्याची तेजस्वी साक्ष आहे.मिशन मंगळ ही केवळ एक मोहीम नव्हती, तर भारताच्या वैज्ञानिक आत्मविश्वासाचा एक सोनेरी अध्याय होता.
राष्ट्रीय विज्ञान दिनाची 2025 ची थीम भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर विज्ञान आणि संशोधनातील कार्यासाठी प्रोत्साहन देणे आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणे. (Empowering Indian Youth for Global Leadership in Science and Innovation for Viksit Bharat) अशी आहे.
"जय जवान ,जय किसान, जय विज्ञान"!
मनोज रामचंद्र चौरपगार
Balsnehi
Amravati
9403618991
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -