मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

#हीमा दास Hima Daas


हिमा दास : "संघर्षातून सुवर्ण कळसाकडे"भारतीय अॅथलेटिक्समध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी हिमा दास ही केवळ एक धावपटू नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांचा पाठलाग कसा करावा याचा जिवंत आदर्श आहे. एका  सामान्य कुटुंबात जन्मलेली हिमा आज भारताची ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळखली जाते. तिच्या जीवनप्रवासात अडथळे होते, अंधार होता, पण तिच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने तिला प्रकाशाकडे नेले.
९ जानेवारी २००० रोजी आसामच्या नागाव जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात हिमा दासचा जन्म झाला. तिचे वडील शेतकरी होते, घरची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. पण परिस्थितीपेक्षा मोठी तिची जिद्द होती. लहानपणापासूनच तिला फुटबॉलची आवड होती, पण तिच्या प्रशिक्षकांनी तिच्या वेगावर लक्ष ठेवून तिला धावण्याचा सल्ला दिला. तिच्याकडे धावण्याचे  बूट घेण्यासाठी पैसे नव्हते. पण इच्छाशक्तीसमोर आर्थिक अडचणी टिकू शकत नाहीत. एका स्पर्धेसाठी तिने साध्या बूटांवर हाताने ‘आदिदास’ असे लिहिले आणि मैदानात उतरली. तिच्या वेगाने आणि जिद्दीने सर्वांनाच अचंबित केले.  जेव्हा तिने सुवर्णपदक जिंकले, तेव्हा  ‘Adidas’ कंपनीने तिला अधिकृत प्रायोजकत्व दिले आणि तिच्यासाठी खास बूट तयार केले. आणि त्यावर लिहल.."हिमा दास"! हीच तर असते मेहनतीची खरी कमाई!
हिमा दास हिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केलेआहे..
✅ २०१८ IAAF वर्ल्ड U20 चॅम्पियनशिप  ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला अॅथलीट.
✅ एशियन गेम्स २०१८  ४०० मीटर आणि ४×४०० मीटर रिलेमध्ये रौप्य व सुवर्णपदक.
✅ २०१९ मध्ये ५ सुवर्णपदकं – युरोपियन अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये सलग ५ सुवर्णपदकं पटकावली.
या यशाने केवळ भारताचा झेंडा उंचावला नाही, तर प्रत्येक सामान्य घरातील मुलामुलींना स्वप्न उंच उडण्याची उमेद दिली.एका स्पर्धेदरम्यान, अंतिम रेषा पार करताना हिमाच्या चेहऱ्यावरची वेदना आणि विजयाची चमक एकाच वेळी दिसत होती. थकव्याने शरीर थांबण्याची विनवणी करत होतं, पण तिच्या मनात फक्त एकच आवाज घुमत होता  "आता थाबलीस, तर पुन्हा संधी नाही!"ती शेवटच्या क्षणापर्यंत धावली, आणि सुवर्णपदक तिच्या गळ्यात पडले. हा क्षण तिच्यासाठी फक्त यश नव्हता, तर संघर्षाच्या प्रत्येक कणाचा सन्मान होता.
हिमा दास हिची कहाणी म्हणजे मेहनत आणि इच्छाशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण,परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही जर तुम्ही जिद्दीने प्रयत्न केले, तर स्वप्ने साकार होतात.
जीवनात अडथळे येतात, पण त्यांना पार करायला मनगटात बळ हवं!
हिमा दास हिच्या संघर्षातून , जिंकण्यासाठी जन्म लागत नाही, तर जिद्द लागते! तिचा प्रवास भारतातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या वेगासोबतच तिच्या कष्टांनाही सलाम!
भारताच्या या सुवर्णकन्येने दाखवून दिलं  "स्वप्नं मोठी असू द्या, पाय जमिनीवर आणि वेग वाऱ्याहूनही जास्त!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...