एकच प्रश्न स्वतःला विचारू -
‘झाडे कोणी तोडली?
भीमाशंकर शंकर येथील जंगल हे एकेकाळी जगातले दोन क्रमांकाचे आदर्श जंगल मानले जायचे जिथे त्या भागात उगवू शकतील अशा सर्व वनस्पती होत्या आणि हवा सुद्धा शुद्ध होती. बाजूचे जंगल तसेच ठेऊन मध्यभागी ज्या पवनचक्क्या उभारण्यासाठी झाडांची कत्तल कोणी केली ? याचा पावसावर परिणाम होणारच ना.
फक्त ३० - ३५ वर्षांपूर्वी महाबळेश्वर कसे होते आणि आज त्याचे काय झाले आहे ? कोणी केली झाडांची कत्तल आणि सिमेंटचे जंगल ?
लोणावळा - खंडाळा ही एकेकाळी थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध होती. आता लोणावळा उजाड होत चालले आहे. कोणी केली झाडांची कत्तल ?झाडांच्या बाबतीत मला महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक जास्त आवडते. अजूनही कर्नाटक खूप हिरवे आहे पण जसे ते २०-२५ वर्षांपूर्वी होते तसे आज दिसत नाही. कोण करते झाडांची कत्तल ?
मेळघाट अभयारण्य 25वर्षापूर्वी आम्हीं पाहिलेला आणि आजचा मेळघाट यामध्ये खूप फरक आहे..
जंगल ओसाड पडत आहेत....
१९७१ सालच्या युद्धात जरी विजय मिळाला असला तरीही युद्धाची किंमत ही मोजावीच लागते. अशाच वेळी भारतात दुष्काळ होता त्यामुळे त्या दुष्काळाची झळ विशेष जाणवली.
भारतात पुरेसे धान्य नसल्यामुळे शेवटी अमेरिकेकडून मिलो विकत आणण्याची वेळ भारतावर आली. आजच्या युवकांनी कधी मिलो हे धान्य कधी पहिले नसेल. मिलो हे जनावरांचे अन्न होते जे भारतीयांना खावे लागले होते.
तूप हे बाजारातून गडप झाले होते आणि जे तूप मिळायचे त्यात भेसळ असायची.
त्याकाळचा भारत आजच्या सारखा श्रीमंत देश नव्हता … किंबहुना जगच आजच्या सारखे नव्हते. आज देशाकडे पैसा आहे आणि बाजारात धान्य आहे. जर बाजारात धान्य नसेल तर विदेशातून विकत आणण्यासाठी पुरेसे परकीय चलन आहे. पण त्या काळात सर्वच वानवा होती. खिशात पैसे नव्हते आणि जरी असले तरी बाजारात धान्य नव्हते आणि असेलच तर त्यात प्रचंड भेसळ असायची.
आता त्या काळातील जी काही चित्र आठवतात ती म्हणजे खपाटीला गेलेली पोट आणि छातीच्या बरगड्या दिसणारी उघडी माणसे आणि त्यांचे निस्तेज झालेले पण वटारल्यासारखे आशाळभूत डोळे.
१९७२ सालचा दुष्काळ मी पाहिलेला नाही पण त्याबद्दल जे ऐकलंय ते सांगतो.
१९७२ साली मोसमी पाऊस वेळेवर झालाच नाही, झाला तो पावसाळ्याच्या शेवटाला म्हणजे सप्टेंबर मध्ये समजा.त्यामुळे खरीपाची पेरणी झाली नाही.तो कोरडा दुष्काळ असला तरी पाण्याची टंचाई नव्हती,जमीनीत पाणी भरपूर होते पण ते पिकांना द्यायला सिंचन सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की, कुठल्याही पिकाचे उत्पादन आजच्या तुलनेत खुपच कमी होते.अगदी चांगले पिकले तरी ते अन्नधान्य वर्षभरासाठीच पुरवायचे.त्यातून १९७२ साली पेरणीच नसल्यामुळे अन्नधान्याची टंचाई होती.जमीनदार लोकांची परिस्थिती बरी असली तरी गोरगरीबांचे हाल होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -