मुख्य सामग्रीवर वगळा

@जोतीराव गोविंदराव फुले

11 में  1888 रोजी जोतिराव फुले महात्मा जोतिराव फुले झाले .

 जनतेने सभा भरवून फुलेंना महात्मा ही पदवी बहाल केली. जनतेने सभा भरवून महात्मा ही पदवी बहाल केलेले एकमेव कृतिशील समाजसुधारक व विचारवंत आहेत.
  अज्ञानाच्या अंधकारात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी जीवनभर ज्यांनी कार्य केलं. अस्पृश्यतेच्या विरोधात कृतिशील आंदोलन उभं केलं. स्वतः च्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. विधवा पुनर्वीवाह असेल किंवा आंतरजातीय विवाह असतील असे जाती अंताचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. चार भिंती मध्ये बंदिस्त असलेल्या महिलांना मुक्त श्वास घेण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शोधा बरोबरच पहिली शिवजयंती साजरी करून महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला.शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झाली हे शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातुन दाखवून दिले. 1882 मध्ये हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावं ही मागणी केली  अशी मागणी करणारे जोतिराव फुले हे पहिले समाजसुधारक ठरतात. आपल्या साहित्यामध्ये बळीराजाचा, खंडोबाचा, हिरण्यकश्यपु, बुद्ध, तसेच शूरवीर महार जातींचा इतिहास मांडला आहे. संपूर्ण जगाला मानवतेकडे घेऊन जाईल असा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ निर्माण केला.फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक चळवळी, अनेक विचारवंत व समाजसुधारक उदयास आले. जोतिरावांच्या नेतृत्वात भारतातली पहिली कामगार संघटना उभी राहिली. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे दिन बंधू वृत्तपत्र उभे राहिले. सत्यशोधक समाज स्थापन करून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या मध्ये समाविष्ट करून घेतले. अश्या या कृतीशील समाजसुधारकाच्या प्रति आदर म्हणून मुंबई मधील भायखळा येथे असलेल्या रघुनाथ महाराज सभागृहामध्ये मुंबईयेथील जनतेने जोतिराव फुलेंना वयाच्या 61 व्या वर्षी महात्मा ही पदवी बहाल केली. सदरील समारंभास रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,रावबहादूर वंडेकर,स्वामी रामय्या अय्यावारू, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी मातब्बर मंडळी उपस्थित होती.पदवी  दान कार्यक्रमानंतर महात्मा फुलेंनी भाषण केलं. जनतेचं प्रेम पाहून फुलेंचं मनभरून आलं. महात्मा फुलेंनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि जोतिराव फुले महात्मा झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.