मुख्य सामग्रीवर वगळा

माणुस म्हणून माझी जबाबदारी काहीच नाही का ?

माणुस म्हणून माझी जबाबदारी काहीच नाही का ?
  आज विटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी एका विटभट्टीवर गेलो . एक आठ वर्षाचा मुलगा ४०से. तापमानात माती गाळतांना दिसला. घामाघूळ झालेला आणि सकाळपासून पोटात अन्नाचा एकही घास न घेतलेला मुलगा काम करतांना त्याच्या वडीलाला विचारले की , तुम्ही एवढी सुंदर विट बनविता त्या विटेने सुंदर कलाकृती इमारत तयार होते मग तुला वाटत नाही का आपल्या या मुलाचं आयुष्य चांगले जावे .
  साहेब , मलाबी वाटते हे मुले शिकावे , शाळेत जावे पण मजबुरी आहे . आता खरीच वाढवतो त्याला .
विटभट्टी मालकांनी स्वतःहून सांगितले की , मी यांना स्वतः घेवून जातो , अरे ही मुले शिकली पाहीजे अशीच जर काम करत गेली तर दुखाची बाब आहे .
     आता बालरक्षकही तेथे पोहचले त्यांना दाखल केले आणि हा विषय संपला मग प्रश्न हा पडतो जेथे पालकाचीच इच्छा नाही तेथे काय ? माझ्या एका मित्रांनी मला मॅसेज केला जर पालकच मुले कामावर नेत असतील तर त्या पालकाना काय म्हणावे ? ऊसतोडीसाठी तांड्याचे तांडे बाहेर पडतात अडकतात पालकासंगे स्थलांतर होणारी निरागस बालके . रोजगार जगण्यासाठी महत्वाचा आहे परंतु शिक्षण कसे जगावे यासाठी महत्वाचे आहे हे कळून सुद्धा कोणीतरी येथे चुकते.
    स्थलांतर काय असते हे आम्ही लॉकडॉउनमध्ये अनुभवले आहे . जेव्हा घरातलं सारं काही संपते त्यावेळेस कुटूंब प्रमुखाला फक्त दिसते कुटूंबांचे पालनपोषण कारण वाचू तर शिकू आणि तेच झाले . जगण्याच्या नादात खरं आयुष्य जगणे सोडून दिले. फाटके कपडे आमचेही असायचे , पँन्टवर ठिगळ आमच्याही असायचे पण आम्ही कधी नाही झालो शाळाबाहय आणि नाही होवू दिले आमच्या वडीलांनी शाळाबाहय! ज्या पिढीने संघर्ष पाहिला त्या पिढीला शिक्षणाचे महत्व कळाले पण येथे संघर्ष आहे तोही अर्धवट शिक्षण सोडलेलं ?
     गावातील माणसे स्थलांतरीत होते मात्र गावातील मुले मात्र थांबतात श्रीरामतांडा , वरवंडी , चांदूरवाडी , आलाडोह , ठाकरवाडी सारखे शेकडो गावे पाहायला मिळतील जेथे मुलांचे स्थलांतर थांबले कारण तेथील पालकांना माहित झाले शिक्षण काय असते . आई गेल्यावर ओमही त्याच्या वडीलाकडे गेला . अप्पानी त्याला त्यांच्याकडे ठेवायचे आहे असे ओमच्या आईनी अप्पाना म्हटले कारण तीला जग सोडताना सुद्धा वाटत होते की माझा ओम शिकावं मोठं व्हावं . तो दिवस आठवतो मला आपरेशनसाठी जाताना ओमच्या आईने बोलवले मला आणि म्हणाली , गुरुजी याला शिकवा याच्या कडे लक्ष दया आता ओमला अभ्यास करायला कोणीच सांगणार नाही . दुसऱ्या दिवसी त्या ओमला सोडून गेल्याचे माहित झाले . आज ओम पाचवी वर्गात शिकतोय कारण येथे सारे काही जुळून आले . मग असे का होतय की , रस्त्याच्या बाजुला आईवडीलासोबत मुले असतात पण शाळेत पाठवण्यापेक्षा ते मुलांना भिक मागायला लावतात . आपण तेथे गेला आणि शाळेबददल म्हटले की म्हणतात , "हा चारशे कमावते आज काय करायचे शायेत धाडून " . मग अशा वेळेस अन्य विभागानी बालरक्षकाना मदत करणे गरजेचे आहे . कधी कधी मारण्याच्या धमक्याही येतात पण त्यांना समजत नाही की आम्ही त्यांच्या भल्यासाठीच आलोय त्यांच्या झोपडीजवळ उज्वल राज्याचे स्वप्न उराशी बाळगून !
    मग स्वतःलाच प्रश्न विचारतो आम्ही माणसेच ना ? का स्थानिक प्रतिनिधी यांच्या समस्या सभागृहात मांडत नाही ? का या विषयाला महत्व दिल्या जात नाही ? कारण हीच मुले उदयाची बिना ध्येयाची मतसंख्या आहे. लाखो रुपयाचे बॅनर झळकतांना दिसतील पण या मुलाच्या अंगावरील फाटलेले शर्टवरील ठिगळ बसवायला पैसे वेळ आणि माणुसपण कुणाचकडे नाही हे माणुसपणाला मारणारा आहे , होय माणुसपणाला मारणारा !
    क्रांतीवीर मधला एक संवाद खूप आवडला , आपण चुप आहोत हेच लक्षण आहे गुलामगीरी स्विकारण्याचे ! होय आपणच सारे काही उघड्या डोळयानी पाहतो क्षणभर चुक ऽ ऽ चुक म्हणतो आणि जशास तसे पण बाबानो भविष्य आपल्या या चुप्पीची दखल घेणारच आहे की , आपण या शाळाबाहय मुलांसाठी आपण काय केलात ?
'मुलांना दाखल करा' , शाळेत दररोज पाठवा ची चित्रफित सगळेजन उत्साहाने एकमेकांना व ग्रृपवर पाठवत आहे पण आपण कधी यासाठी प्रयत्न केलात का ? आई कामाला जाते म्हणून बाळाला सांभाळणाऱ्या त्या शाळाबाह्य झालेल्या छकुलीला शाळेत आणण्यासाठी वा पाठवण्यासाठी प्रयत्न केलात कधी ? नाही ना मग एक सोनेरी क्षण आपल्या या पवित्र कामाची वाट पाहतोय. पालकांनी खरंच जागृक होण्याची गरज आहे . आपले आयुष्य तर कामात संघर्षात गेलेत परंतु आपल्या इवलश्या मुलांना शाळेत पाठवा . विटभट्टीच्या , उसशेताच्या , मोठ्याबांधकामाजवळ , आपण पालमांडून राहत असलेल्या वस्तीत आहे की हो शाळा , पाठवून सहकार्य करा बालरक्षक चळवळीला आणि हातभार लावा आपले राज्य शाळाबाहय मुल मुक्त करायला .
                  विनोद राठोड
         बालरक्षक टिम महाराष्ट्र
<

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.