मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ. हिरालाल मकेश्वर मराठी माणूस उर्दू शिक्षक.

हिरालाल बाबूलाल मकेश्वर ( केंद्रप्रमुख ) हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा अल्पसा परिचय डॉ हिरालाल बाबुलाल मकेश्वर मुळगाव वाठोडा शुक्लेश्वर पंचायत समिती भातुकली जिल्हा अमरावती.त्यांचे  इयत्ता पहिली पासून ते
एम. ए. बी. एड. पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण हे उर्दू भाषेत झाले आहे  त्यांची एकूण 36 वर्ष सेवा झाली आहे .ते सहाय्यक शिक्षक पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख, गटसमन्वयक, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अशा विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. आणि त्यानी प्रत्येक पदाला योग्य न्याय दिला आहे .त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे उर्दू भाषेत झाल्यामुळे त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते अनेक उर्दू भाषिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती ही असायचीच त्यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गुरुजनांचे मार्गदर्शन सहकाऱ्यांचे प्रेम यामुळेच ते अनेक अडचणींवर मात करत पुढे जात राहिले. त्यांच्या कणाकणात उर्दू भाषा जाणवत होती. त्यांनी 26 वर्ष अध्ययन अध्यापनाचे कार्य फक्त उर्दू शाळेतच केले आहे .त्यांचे अनेक विद्यार्थी शासकीय-निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत .तसेच अनेक विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय उत्तम प्रकारे करीत आहे. काही विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करीत आहे .त्यांची प्रथम नियुक्ती सहाय्यक शिक्षक या पदावर झाली .तेव्हा एसएससी डीएड हीच शैक्षणिक पात्रता होती. अध्ययन अध्यापन कार्य करीत असताना सेवेतच त्यांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता एम. ए. बी. एड. पी.एचडी पर्यंत वाढविली आणि ते नेहमी  एक विद्यार्थी म्हणून राहिले आहेत.
 उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी विविध स्तरावर जसे विभागीय स्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर, स्मार्ट पीटी च्या माध्यमातून फक्त उर्दू भाषेकरीता एक उत्कृष्ट आर.पी म्हणून कार्य केले आहे त्यांची सेवा  नांदेड जिल्हा पंचायत समिती मुखेड अमरावती जिल्हा पंचायत समिती धारणी, दर्यापूर पंचायत समिती येवदा, वडनेर गंगाई आणि दारापुर भातकुली पंचायत समिती खोलापूर अशा ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे सेवा केली आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे उर्दू भाषिक मित्र परिवार आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यात सर्वच तालुक्यात त्यांचा मित्र परिवार आहे .त्यांच्या अर्धांगिनी ह्या जिल्हा परिषद अमरावती पंचायत समिती दर्यापूर मधील दारापूर या ठिकाणी शिक्षिका आहेत. त्यांनी दर्यापूर पंचायत समिती मधील सामदा व रामतीर्थ या दोन्ही केंद्राचा प्रभार उत्तमरित्या यशस्वीपणे सांभाळला आहे.
या केंद्रातील सर्व शिक्षक एक कुटुंबासारखी आहेत .त्यांनी केंद्रात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत .केंद्रातील शिक्षकांना प्रेरणा देणारे ते एक उत्तम व्यक्तिमत्व होते. त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे उर्दू भाषेत झाल्यामुळे उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते .अनेक उर्दूभाषिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती ही आवर्जून असायचीच.त्यांचे पुढील आयुष्य निरोगी आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण सेवा निवृत्त होतय, आमचा निरोप घेताय, हे अगदी खरं ;पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील! तुमच्या सहवासात घालवलेले अनेक चांगले क्षण आजही आमच्या मनात रंजीत घालत आहेत .तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, आम्हाला सतत आठवतच राहील. तुमचं इथून पुढचं आयुष्यही  असच सुख-समाधानाचे जावो हीच पुनच्छ ईश्वरांकडे प्रार्थना.
@ बालस्नेही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.