मुख्य सामग्रीवर वगळा

21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार*🪐🪐🌔

 21 डिसेंबर गुरु -शनि महायुतीचे बना प्रत्यक्ष साक्षीदार


      सरत्या वर्षात *२१ डिसेंबरची रात्र* आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री *साडेसात ते साडेनऊ* या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या *सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.* हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.  🌎पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात *गुरु आणि शनी* हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते *यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते.* या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. *आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे.* या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी *दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता.*                       जेव्हा 🌕🟠दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. याबाबत मुंबई येथील नेहरू तारांगणचे अरविंद परांजपे म्हणाले, *"गुरू"* 🌕हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो. तर 🪐 *"शनिला"* २९.५० वर्षे लागतात. या दोन्हींचा परिणाम असा, की दर सुमारे १९ वर्षे आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. पण, प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात. दि.२१ डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणि ६ विकला) अंतरावर असतील.   ज्यांची नजर तेज आहे अश्या लोकांना *२१ डिसेंबर रोजी 🪐🌙शनीचा चंद्र टायटन हाही दिसू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी 🔭दुर्बिणीची आवश्यकता नाही.  गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर 6 ते 8.30pm या वेळेत पश्चिमेच्या आकाशात क्षितिजापासून 30 अंश उंचीवर *दोन ठळक चांदण्या* दिसत आहेत. इतर चांदण्यांप्रमाणे अजिबात न टिमटिमणाऱ्या या दोन्ही चांदण्या म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठे दोन ग्रह गुरु व शनि आहेत. हे दोन्ही ग्रह  दुर्बिणीशिवाय सहजपणे पाहता  व ओळखता येतात .. 
*त्यांपैकी मोठी चांदणी म्हणजे गुरु ग्रह* ... 
*तर छोटी चांदणी म्हणजे शनि ग्रह* ...

गुरु हा सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह सुर्यापासून सरासरी *80 कोटी किमी* दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 12 वर्षे लागतात .. तर शनि हा सुर्यमालेतील सर्वात सुंदर कडी असणारा ग्रह  सुर्यापासून सरासरी *150 कोटी किमी* दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 29.5 वर्षे लागतात . त्यामुळे पृथ्वीवरून रात्रीच्या आकाशात पाहताना त्यांची दर 20 वर्षांनी युती होतच असते. म्हणजे हे दोन्ही ग्रहजवळ आलेले दिसतात ..
      पण या दर वीस वर्षांनी होणाऱ्या युतीत गुरु व शनि विशिष्ट अंतरावर एकत्र येतात. मात्र या वेळी *21 डिसेंबर 2020 रोजी महायुती* घडेल , म्हणजे गुरु व शनि एवढे एकत्र येतील कि दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून *एकच चांदणी* दिसू लागेल. आकाशात गुरु व शनिची ही अशी अवस्था दिनांक 20 , 21, व 22 डिसेंबर पर्यंत पाहायला मिळेल. यालाच गुरु व शनिची महायुती म्हणतात ..
   22 डिसेंबर नंतर गुरु ग्रह शनिला ओलांडून पूर्वेकडे (वर ) सरकताना दिसेल त्या दोन्हीं ग्रहातील अंतर दिवसेंदिवस वाढत जाईल. गुरु शनिच्या महायुतीची ही घटना *1623* साली घडली होती. तेव्हा गॅलिलीओ गॅलिली नुकताच दुर्बीणी चा वापर करू लागला होता. आणि यानंतर ही घटना *2080* साली पुन्हा घडेल. त्यामुळे आपणाला या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची हीच एकमेव संधी आहे. तेव्हा ही संधी दवडू नका .
      आजपासून पुढचे 2 -3 दिवस रोज सायंकाळी सूर्य मावळल्यापासून आकाशात हे दोन ग्रह शोधूया . 
*21 डिसेंबर पर्यंत या दोन ग्रहांतील कमी होत जाणारे अंतर* , 
*21 डिसेंबरची दोन्ही ग्रहांची महायुती* आणि त्यानंतर या *दोन ग्रहांत रोज वाढत जाणारे अंतर* याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया .दुर्बीण असेल तर त्यातून हे दोन्ही ग्रह पाहणे ही सुद्धा एक मोठी खगोलीय संधीच असेल. पण दुर्बीणीशिवायही सर्वांना या घटनेचा अनुभव घेणे सहज शक्य आहे. 
रात्रीच्या आकाशात अशा अभूतपूर्व घटना घडत असतात आणि विश्वातील अनेक सत्य व आश्चर्य मानवासमोर उलगडत असतात. आपण मात्र ग्रहताऱ्यांच्या अज्ञानापोटी अंधश्रद्धा जोपासत ग्रह ताऱ्यांना राशी नक्षत्रांना घाबरत राहतो आणि निसर्गाने बहाल केलेल्या विश्वाला समजून घेण्याच्या संधी अवैज्ञानिक भितीपोटी गमावत राहतो ..
     *शनि किंवा कोणताही ग्रह दुष्ट /वाईट /अशुभ नसतो*. त्यामुळे *शनिची साडेसाती ही निवळ अंधश्रद्धा* आहे . कोणत्याही *राशी नक्षत्रे आपले भविष्य ठरवत नाहीत आणि बिघडवतही नाहीत*. आकाशाविषयी असणाऱ्या अशा अंधश्रद्धांना बळी पडून घाबरून ही संधी घालवू नये.



*सर्व जिल्हयातील/ तालुक्यातील केंद्रप्रमुख  विषयसाधन व्यक्ती, केंद्रीय HM, IE चे विषय तज्ञ व विषय शिक्षक या सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेनी सर्व पालक व विद्यार्थी यांना ही घटना पाहण्याचे आवाहन करावे.
मनोज चौरपागर 
अमरावती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.