मुख्य सामग्रीवर वगळा

#लहान मुले करोना व आपली जबाबदारी.

#लहान मुले,करोना व आपली जबाबदारी... लहान मुलांच्या लक्षणांबाबत काही वैद्यकीय शास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत मांडत आहेत. संशोधन करीत आहेत.  वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मते, करोना विषाणूचा कण हा पेशीतील एसीई-२ रिसेप्टरला चिकटतो आणि पेशीमध्ये त्यांची वाढ होऊन, तो शरीराच्या अन्य पेशींमध्ये पसरतो. लहान मुलांमध्ये एसीई-२ ची  वाढ जास्त न झाल्याने, करोना विषाणूची बाधा तुलनेने कमी दिसते. करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुलांमध्ये कमी प्रादुर्भाव झालेला असला, तरी त्यांच्यामध्ये मोठ्या माणसांमध्ये दिसून येणारी श्वसनसंस्थेशी निगडीत तीव्र लक्षणे आतापर्यंत तरी दिसलेली नाहीत; पण अलीकडेच काही गूढ लक्षणे न्यूयॉर्कमधील काही रुग्णालये, तसेच अमेरिकेतील काही करोनाग्रस्त प्रदेशांत, इंग्लंड आणि स्पेनमधील रुग्णालयांत दाखल झालेल्या लहान मुलांमध्ये दिसली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव हा जास्त धोकादायक असू शकतो.

#नवी लक्षणे,                             'कावासाकी डिसीज' आणि 'टॉक्सिक शॉक', ज्याला आपण मराठीत 'विषारी धक्का' म्हणतो, या रोगांशी मिळतीजुळती आहेत. विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ही लक्षणे काही दिवसांनी दिसू शकतात. त्यामध्ये १०२ किंवा १०३ अंश ताप,  घसा दुखणे किंवा घसा सुजणे, पोटात दुखणे, उलट्या, संडास, अंगावर, तळहातांवर आणि तळपायावर चट्टे आणि पुरळ, लसिका गाठींची सूज अशी लक्षणे जी 'कावासाकी डिसीज'मध्ये दिसतात, ती दिसत आहेत. विषारी धक्का किंवा टॉक्सिक शॉक सिंड्रोममध्ये दिसणारा अतिशय कमी रक्तदाब दिसत आहे. अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत अमेरिकेमध्ये या 'मल्टी सिस्टिम इम्फेमेटरी सिंड्रोम'मुळे तीन-चार लहान मुले दगावली आहेत. भारतामध्येही काही मुलं करून पॉझिटिव्ह आढळून आलेली असून काही लहान बालके यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत

#मित्र बना,
मुलांशी करोनावर बोलणे हे तणावपूर्ण वाटू शकते, तरीही मुलांना खरी माहिती देणे आवश्यक आहे. त्यांच्या मनातून भीती काढून, त्यांना सुरक्षिततेची हमी देणे गरजेचे आहे. मुलांच्या मनामध्ये काय शंका आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचे प्रश्न व्यवस्थित ऐकून, साध्या, सोप्या भाषेत उत्तरे द्या. उत्तर माहीत नसेल, तर प्रामाणिकपणे माहीत नाही असे सांगा.  वेळोवेळी मुलांशी बोलून कोणकोणती वैयक्तिक आणि कौटुंबिक काळजी घ्यायला हवी, याची चर्चा करा. मुलांना त्यांचे मत आणि भावना व्यक्त करण्यास उद्युक्त करा. अशा काळात रागावणे किंवा दु:खी असणे हे स्वाभाविक आहे, हे मान्य करायला शिकवा. मुलांना तुमच्याजवळ येऊन प्रश्न विचारण्यास उद्युक्त करा. यामुळे मुलांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. करोना हा तुलनेने नवीन विषाणू आहे. जगभरात शास्त्रज्ञ खूप कष्ट करून, विषाणूची अधिक माहिती मिळवत आहेत. लोकांना सुरक्षित ठेवणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. मुलांबरोबर ती अधिक सुरक्षित कशी राहतील, याविषयी बोलणे गरजेचे आहे.
#हात धुवून घ्या,
मुलांनी सतत आणि व्यवस्थित हात धुणे गरजेचे आहे. विशेषतः घरी आल्यानंतर, जेवणापूर्वी, नाक शिंकरल्यानंतर, खोकल्यानंतर हात धुणे खूपच महत्त्वाचे आहे. मुलांना टिश्यू पेपरमध्ये कसे खोकायचे व शिंकायचे, त्यानंतर तो कागद कचराकुंडीत व्यवस्थित कसा टाकायचा, तसेच बाह्यांमध्ये अथवा कोपऱ्याच्या त्रिकोणात कसे शिंकायचे, हे शिकवणे गरजेचे आहे. घरातील सातत्याने स्पर्श होणाऱ्या वस्तू आणि पृष्ठभाग जंतुनाशकाने साफ करीत राहणे हेही महत्त्वाचे आहे. मुलांना हात धुताना, साबणाचे छोटे छोटे बुडबुडे कसे निर्माण करायचे आणि बोटे तळांपासून बेचक्यातून आणि पेरापर्यंत कशी धुवावीत हे दाखवा. अंगठे धुणेही गरजेचे आहे. मुलांना 'हॅपी बर्थ डे' हे गाणे दोनदा म्हणायला लावा, जेणेकरून हात धुण्यासाठी २० सेकंदांपेक्षा जास्त वेळ व्यवस्थितपणे देता येईल.

#घरीच रहा,
सध्या शाळा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुटी असल्यामुळे मुलांनी घरी बसणे हे कसे फायेदशीर आहे, हे त्यांना समजावून सांगा. करोनाचा संसर्ग त्यामुळे कसा टाळता येतो, ते सांगा. घरी बसणे हा करोनाचा संसर्ग टाळण्याचा खात्रीशीर उपाय असल्यामुळे, त्यांचे जीवन लवकरच पूर्ववत होईल, याची खात्री द्या. जनसंपर्क टाळणेही आवश्यक आहे. घराबाहेरील लोकांना टाळणे गरजेचे आहे. कुठेही उभे राहताना साधारणपणे एका मोठ्या सायकलीएवढे किंवा सहा फूट अंतर हवेच. घराबाहेरील व्यक्तींना केवळ हसून किंवा हात दाखवून अभिवादन करा. हस्तांदोलन टाळा. चौरस आणि सकस आहार घेणे, चांगली झोप, दररोज व्यायाम करणे, या आरोग्याची काळजी घेण्याच्या काही चांगल्या सवयी आहेत. तुम्ही अशा सर्व गोष्टींना कसा प्रतिसाद देता, हे मुले पाहत असतात. अशा स्थितीत मनाची घालमेल होणे अनुचित नाही, हे समजावून सांगा. तुमच्या नेहमीच्या कौटुंबिक गोष्टी चालू ठेवा. वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, एकत्र जेवण, आराम आणि झोपेच्या वेळा नियमित ठेवा. अशा गोष्टींमुळे मुलांना तुमचे नियोजन कळेल आणि सर्व गोष्टी आपल्याच नियंत्रणात आहेत, हे लक्षात येईल. एखाद्या फळ्यावर सर्व गोष्टींचे वेळापत्रक लिहिले आणि त्याची अंमलबजावणी झाल्यावर खुणा केल्या, तर काही गोष्टी साध्य झाल्याचे समाधान मिळेल.
#दुर्लक्ष करा
करोनाच्या बातम्यांचा भडीमार भीतीदायक ठरू शकतो; त्यामुळे बातम्या किती बघायच्या यावर नियंत्रण ठेवा. त्याचप्रमाणे सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून येणाऱ्या अफवा आणि चुकीच्या माहितीपासून मुलांना दूर राहायला शिकवा.

#छंद
मुलांना कोडी, कला, वाचन, संगीत ऐकणे किंवा शिकणे अशा गोष्टींसाठी उद्युक्त करा. मुलांशी खेळा. वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवा. चित्रपट, नाटके पहा. एकत्र वाचन करता आले, तर अगदी सोन्याहून पिवळे! टेलिफोन, फेसटाइम, व्हॉट्सअॅपचा वापर करून, मित्रमंडळी, नातेवाइकांशी संबंध ठेवा, जेणेकरून एकटेपणा टळेल आणि नातेसंबध आणखी घट्ट होतील. कुठल्याही जातिधर्माबद्दल किंवा समुदायाबद्दल तेढ निर्माण करू नका. सातत्याने झोपेविषयी, खाण्यापिण्याच्या सवयींविषयी किंवा लक्ष विचलित होणाऱ्या काही समस्या आल्या असतील, तर तुमच्या फॅमिली डॉक्टरची किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. त्यांचा सल्ला जरूर घ्या. या सगळ्या बाबी लक्षात ठेवल्या, तर सध्याच्या स्थितीशी सामना करता येईल.


साभार-goole ,bbc, wikipedia,mahatimes
&बालस्नेही, महाराष्ट्र.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.