मुख्य सामग्रीवर वगळा

#कोविड रुग्णांसाठी अमरावती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा..

*‘रुग्णसेवेच्या यज्ञात लोकप्रतिनिधींची ‘अर्थसंमिधा’*

*कोविड रुग्णांसाठी अमरावती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा* 

श्रीनाथ वानखडे/दि.22 मे 21
भारतीय शासनव्यवस्थेत वरिष्ठांनी आदेश द्यायचे व कनिष्ठांनी ते पाळायचे.याच व्यवस्थेतील जिल्हा परिषद एक महत्वाचा घटक.कोविडच्या आपत्तीकाळात समाजाला आपलंही देणं लागतं हा विचार मांडल्या गेला.या विचारातूनच जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांसह सर्व कर्मचारी एकवटले व वर्गणी गोळा केली.नेहमी आपल्या आदेशाचे पालन करणारे कर्मचारी जेव्हा संघटना मतभेद बाजूला सारून रुग्णसेवाचा यज्ञ तेवत ठेवत आहे हे अनुभवले तेंव्हा या यज्ञात पक्षभेद बाजूला ठेवत जिल्हा परिषद अध्यक्ष सह ईतर सदस्यांनी सुद्धा अर्थसंमिधा अर्पण केली.
मे महिन्याच्या सुरुवातीला कोविडची रुग्णसंख्या अचानक वाढीला लागते.अमरावती जिल्हातून कोविड आजाराचे नवीन रूप धारण केल्याच्या वावड्या सर्वत्र उठल्या.याच कालावधीत जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदा टाळेबंदी केल्या गेली.जे होत आहे ते भीषण होत आहे.शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक आहे हे अनेकांनी ऐकले होते.यामधून प्राथमिक शिक्षकांच्या एका माध्यम गटावर एक विचार पुढे आला.आपण किती दिवस बंदिस्त रहायचे.आपलंही या समाजाला देणं लागतं.आपणच जर समाजासाठी पुढाकार घेतला तर ?येथूनच  सुरु होतं नवीन मिशन ‘चला जीवन वाचवूया’.
अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत सुमारे सहा हजार शिक्षक कार्यरत आहेत तेवढेच कर्मचारी ईतर विभागात कार्यरत आहे.शिक्षकांचा हा संदेश समाजमाध्यमावर वायरल होतो.कर्मचा-यां सोबतीला अधिकारी पुढे येतात.प्रत्येकाच्या वेतनातून किमान एक हजार जमा करायचा हा निर्णय सर्वसंमत होतो नि यातूनच तब्बल एक कोटीचा अर्थसहाय्य तयार होते.जमा केलेल्या निधीतून कोविड रुग्णांसाठी कोविड सेंटर व मार्गदर्शन केंद्र सुरु करायचा हे ठरते आणि यातूनच जिल्हा परिषद विश्रामगृह,मालटेकडी येथे सुसज्य कोविड सेंटर उभारल्या जाते.

*शांतीदुताला अनोखी श्रद्धांजली* 
जिल्हा परिषद कर्मचारीनी मांडलेल्या विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आला.याच काळात जिल्ह्यात कडक लॉकडॉउन लागल्याने हि मोहीम थंडावली.मिशन मोडवर काम करणाऱ्या शिपायांच्या मनात थोडी कामाबद्दल कालवाकालव निर्माण झाली.त्यांनी लगेच जिल्हा परिषद अध्यक्ष मा.बबलुभाऊ उर्फ अनिरुद्धजी देशमुख यांच्या समोर या मोहिमेची कल्पना दिली.’राजा बोले नि दल हाले’ याची प्रचीती आली.अवघ्या पाच दिवसात जिल्हा परिषद विश्रामगृहाचा चेहरामोहरा बदलविला.भारताचे माजी पंतप्रधान मा.राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचीत्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे हस्ते या कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अविशांत पांड्या यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

*लोकप्रतिनिधींचे अर्थसहाय्य*
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या  समाजसेवेपासून प्रेरणा घेवून जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला.कोविड सेंटर च्या उद्घाटनानंतर जिल्हा परिषद ची स्थायी समितीची सभा होती.या सभेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी व सर्व सदस्यांनी आपले एक महिन्याचे मानधन कोविड केअर सेंटर देण्याचा निर्धार केला.शिवाय कोरोनाची तिसरी लाट हि मुलांसाठी घातक असल्याने व शिक्षक लहान मुलांच्या संपर्कात जास्त येत असल्याने शिक्षकांना लसीकरणासाठी तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

*सुसज्य कोविड सेंटर* 
विश्रामगृहातील १० खोल्यांमध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध केले असून प्रत्येक खोलीत केवळ दोन रुग्णाचे सुसज्य बेड ऑक्सिजन व वातानुकूलित व्यवस्थेसह उपलब्ध करून दिले आहे.रुग्णाच्या सेवेकरिता चार तज्ञ डॉक्टरांची चमू चोवीस तास कार्यरत आहे.सर्व औषधी मोफत असून रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध आहे.रुग्णाला ला दररोज डायट प्लान नुसार नाश्ता व जेवण उपलब्ध करून दिल्या जात आहे.

*कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा* 
या सेंटरवर  उत्तम सेवा उपलब्ध व्हावी याकरिता तज्ञ डॉक्टरांसमवेत, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक  व सुरक्षा रक्षक परिश्रम घेत आहे.त्यांच्या सहकार्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यानी स्वयंसेवा देत आहे.दर दिवशी २४ तासापैकी दर ८ तासांनी कर्मचारी स्वयंपुढाकाराने आपल्या सेवा बजावत आहे.कोविड सेंटर च्या शुभारंभ दिनाला काही रुग्ण येथे भरती झाले असून त्यांनी सुद्धा कर्मचार्यांच्या या सेवा वृत्तीचे स्वागत केले आहे.शिक्षक व जिल्हा परिषद कर्मचारी या सेवावृत्तीचे समाजात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.








#बालस्नेही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.