जिल्हा परिषद अमरावती कोविड केअर व समुपदेशन सेंटरचे पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी केले लोकार्पण.
*👉🏻 जिल्हा परिषद अमरावती कोविड केअर व समुपदेशन सेंटरचे पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी केले लोकार्पण.*
*👉🏻 25 बेडची झाली तातडीने उपलब्धता.*
*👉🏻 कोविड केअर सेंटर उभारणीसाठी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्या आर्थिक सहयोगाचा लागणार हातभार.*
अमरावती.. 21 मे 2021
*जिल्हा परिषद अमरावती द्वारा संचालित कोविड केअर व समुदेशन सेंटरचे लोकार्पण जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, आरोग्य तथा वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, समाज कल्याण सभापती दयाराम काळे, महिला व बाल कल्याण सभापती सौ पूजाताई संदीप आमले, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले, यांच्यासह मान्यवर जि प सदस्य, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, कर्मचारी संघटना प्रतिनिधी, शिक्षक संघटना प्रतिनिधी, हे कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून उपस्थित होते.*
*अमरावती जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मालटेकडी जवळच्या जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात सुसज्ज असे 25 बेडचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्यात आले. याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्यातून माहे एप्रिलच्या वेतनातून प्रत्येकी एक हजार रुपये कपात करून यातून सुमारे 90 लक्ष रुपयाचा जि.प.अमरावती कोव्हिडं केअर रिलीफ फंड उभा राहणार आहे.*
*जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणबले यांनी या कोव्हिडं केयर सेंटर साठी डॉ.रोमील वारकरी, डॉ. जीवन रायबोर्डे, डॉ. नूतन डांगे, डॉ. मौ.साजिद अकबर, या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे*
*गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमन कमी न होता वाढतच जात आहे आणि या कोरोनाचे बाधित होऊन अनेक जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक कोरोनाचे बळी ठरले आहे. या बाबीची तातडीने दखल घेऊन जि प अधिकारी-कर्मचारी व शिक्षक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला.आणि चर्चेतून कोव्हिडं केयर सेंटर उभारण्याची संकल्पना समोर आली. या कोव्हिडं केयर सेंटर च्या निर्मितीच्या निमित्ताने अमरावती जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचे याप्रसंगी पालकमंत्री ना. यशोमतीताई ठाकूर आणि बबलुभाऊ देशमुख ,अध्यक्ष यांनी सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.*
*या कोविड केअर सेंटर करिता सर्वतोपरी मदत करण्याची तयारी पालकमंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख यांनी यावेळी दर्शविली.*
*शिक्षकांच्या माहे एप्रिलच्या वेतनातून कपात करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड.खान यांनी तातडीचा आदेश जारी केला आहे.*
*या छोटेखानी लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन मनोज रामचंद्र चोरपगार यांनी केले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोविड केअर व समुपदेशन सेंटरला सेवा देण्यासाठी सुसज्ज असून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकारी,शिक्षक यासोबतच जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून सर्व उपस्थितांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले यांनी आभार मानलेत..*
🔆🔆🔆🔆
*अत्यंत महत्त्वाचे आपण वाचा आपल्या जिवलगांना सांगा*
*जि. प.अमरावती कोविड केयर आणि समुपदेशन केंद्र*
*पत्ता*
*जि.प.विश्रामगृह,मालटेकडी जवळ, अमरावती*
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
*आपल्या नातेवाईकांपैकी किंवा परिसरातील माहितीतील व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या पेशंट ची गैरसोय न होता वेळेवर उपचार व्हावे, यासाठी सर्वांच्या माहितीस्तव आपल्या या कोविड केयर व समुपदेशन केंद्राबाबत पोस्ट टाकल्या जात आहे....*
*विशेष सुविधा......*👇👇
*👉🏻एकूण सुसज्य25 बेड ची व्यवस्था....*
*👉🏻 चार तज्ञ डॉक्टरांच्या चमुद्वारे 24 तास सेवा.....*
*👉🏻एका रूम मध्ये फक्त दोनच पेशंट राहील....*
*👉🏻सर्व रूममध्ये AC ची सुविधा.....*
*👉🏻सर्व औषधी मोफत...*
*👉🏻डॉक्टर च्या सल्ल्यानुसार सांगितलेल्या रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत.......*
*👉🏻रुग्णवाहिका सुविधा.....*
*👉🏻 ऊर्जा निर्माण होण्यासाठी सकाळी रोज एक तास समुपदेशन...*
*पेशंट ला रोज कोविड डायट प्लान नुसार नास्ता, चहा, दोन्ही वेळचे जेवण,गरम पाणी हे मोफत दिल्या जाईल (उत्तम क्वॉलिटी )*
*फ्रुटस, ड्रायफ्रूटस , दूध दिल्या जाईल.....*
*आपण आपल्या माध्यमातून जर या सेंटर बाबतची माहिती दिली तर आपण बऱ्याच लोकांना या कोरोना पासून वाचवून जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य करू शकतो.*
*विनंती..*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -