मुख्य सामग्रीवर वगळा

#वैशाख पौर्णिमा ...

"वैशाख पौर्णिमा "

    #२६_मे_बुध्द_पौर्णिमा, #बुद्ध_जयंती..
   विश्ववंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीच्या, अखंड विश्वाला मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!!
     


सुक्ष्मजीवापासुन ते मानव जातीचा, संपूर्ण सृष्टीचा दुःख मुक्तीचा, कल्याण कारी, आंनदाचा व वैभवाचा दिवस,

याच वैशाखी पौर्णिमेला, या सृष्टीमध्ये तीन अतिशय कल्याणकारी घटना घडल्या

1) सिध्दार्थ गौतमाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला 
2) सिध्दार्थाला संबोधी प्राप्त झाली वैशाखी पौर्णिमेला 
3) तथागत सम्यक सम्बुध्द यांच महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेलाच......

अशी ही पवित्र व मंगल वैशाखी पौर्णिमा,  तुम्हाला वेदनामुक्त, वासनामुक्त, विकारमुक्त असो, तुमच्या जीवनात मंगल मैत्री व करुणेची वृध्दी होऊन प्रज्ञा जागृत हो. धम्माचे आचरण तुमच्या हातून घडो.

    "सर्वांचे कल्याण होवो.    

 बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा अष्टांग मार्ग’ किंवा मध्यम मार्ग’ सांगितला.

अष्टांगिक मार्ग

अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या अंगीकारल्यास मानवाचे जीवन सुखमय होते.

१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धारविचार.

३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे.

४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.


विपश्यना  ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली  ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना या नावाने ही ध्यानपद्धती जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय. पाली भाषेत "विपस्सनाशब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. गौतम बुद्धाने स्वतः  या ध्यानपद्धतीचा अभ्यास करूनतिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे गौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही ध्यान पद्धती आचरली गेली.

 आनापानस्मृतिभावना दीर्घ आश्वास प्रश्वास किंवा र्‍हस्व आश्वास प्रश्वास याचे एकदा आकलन झाले म्हणजे आपण समाधीच्या मार्गात उतरलो असे समजावे.  पण तेवढ्याने कृतकृत्य न होता किंवा पुढल्य चौकडीच्या अभ्यासास न लागता पहिल्याच चौकडीचा अभ्यास दृढ करावा.  तो इतका की,भयहर्ष किंवा अशाच एखाद्या संभ्रमकारक प्रसंगी आपले चित्त विभ्रांत न होता एकदमआश्वास-प्रश्वासांवर यावे.  जेव्हा जेव्हा आनापानस्मृतिभावना कशी करावी हे भगवंताने सांगितले आहे,  तर त्याला अप्रतिम प्रीतिसुख अनुभवण्यास मिळाल्यावाचून रहात नाही. 

त्यानंतर असे आनंदकारक आणि सुखकारक चित्तसंस्कार जाणून घेऊन आश्वासप्रश्वासकरायचा असतोआणि अखेरीस ते शांत कसे होतीलआणि मनाचा सूक्ष्म कंपही कसा थांबेलयाविषयी प्रयत्‍न करावयाचा असतो.  म्हणूनच, 'चित्तसंस्कार शांत करून अश्वास प्रश्वासकरण्याचा अभ्यास करतो,' परंतु या प्रयत्‍नाने चित्त मंदावत जाण्याचा संभव असतो.  त्यासाठी चित्त जाणून आश्वास प्रश्वास करावा लागतो.  नंतर चित्ताला प्रमुदित करूनचित्ताचे समाधान करून आणिचित्ताला विमुक्त करून आश्वास करण्याचा अभ्यास करावयाचा असतो.  चित्त विमुक्त ठेवण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.ज्यालाजगाची अनित्यता पहावयाची असेली त्याला ती ध्यानाच्या योगे अत्यंत सूक्ष्म झालेल्या आपल्याच अश्वास-प्रश्वासांत विशदपणे दिसून येणार आहे.  फूल फुलून ते कोमेजून जाण्यास एक दोन दिवस लागतात.  पिकलेले फळ किंवा पान देठापासून गळून पडण्यास काही काळ जातोपरंतु आपल्या आश्वासप्रश्वासांची घडामोड क्षणोक्षणी चाललेली असतेआणि ती जर आपणास आकलन करता आलीतर अनित्यतेचा अनुभव घेण्यास मूळीच उशीर लागणार नाही. अनित्यतेच्यायोगे वैराग्याचा अनुभव घेण्यास सापडतो.  त्यायोगे सर्व मनोवृत्तीचा लय कसा होतो याचे ज्ञान होतेआणि मग सर्वत्याग कसा असतो हे समजते.  या सर्वांचा अनुभव घेऊनआश्वास प्रश्वास चालविला असता योग्याला निर्वाणप्राप्‍ती होण्यास विलंब लागत नाही.

विपश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य विकारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा उद्देश केवळ शारिरीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतुचित्तशुद्धीमुळे कित्येक मनोशारीरिक आजार आपोआप दूर होतात. वस्तुतः विपश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे - मोहद्वेष तसेच अविद्या दूर करते. तर जो कुणी ह्या साधनेचा नियमित अभ्यास करत राहिला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसिक विकारांपासून पूर्ण मुक्त होऊन नितांत विमुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो.

!!सर्वांचे मंगल होवो!!!!

@ बालस्नेही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.