NCERT
केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा 2023
National Council of Education Resaerch and Training ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे.
याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे, शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी इ. स. १९६१ मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद एनसीआरटीची काही प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे:
राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे
प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण (युईई)
व्यावसायिक शिक्षण
विशेष गरज असलेल्या समुहांचे शिक्षण
शिशु शिक्षण
माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान
स्पर्धात्मक गुणवेत्तेचे शिक्षण
बालिका शिक्षण
अध्ययन-अध्यापन अनुभव तयार करणे
अध्यापन शिक्षणामध्ये सुधार योजना.
अध्यक्ष
(केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री),
सदस्य - विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष,
सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री,
चार विभागांतील विद्यापीठां पैकी चार विद्यापीठांचे कुलगुरू,
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,
केंद्रीय मानव संसाधन खात्याचे सचिव इ.
शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे,
विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांना शिक्षणविषयक कार्यामध्ये विस्तार सेवा पुरवणे,
शिक्षणविषयक माहिती ज्ञान यांचा प्रसार करणे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे, शिक्षणासंदर्भात पुस्तके, नियतकालिके व साहित्य व प्रकाशनाची कार्य करणे.पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ ही संस्था व्यावसायिक व कार्यानुभव शिक्षणामध्ये संशोधन, प्रशिक्षण विकास व विस्तार कार्यक्रम राबवते.
राष्ट्रीय शिक्षण संस्था, दिल्ली -
ही 'एनसीइआरटी' ची सर्वात प्रमुख संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. उदा. शालान्त पूर्व व प्राथमिक शिक्षा विभाग, विज्ञान व गणित शिक्षण विभाग शिक्षणविषयक मूल्यमापन विभाग, संगणक शिक्षण व तांत्रिक साधने विभाग इ.
केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था, दिल्ली - शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे उदा. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट आदींच्या साहाय्याने शिक्षण प्रचार व प्रसार करणे. या संस्थेने सहा राज्यांमध्ये राज्य शिक्षण तंत्रज्ञान संस्था स्थापन केलेल्या आहेत
(महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा व उत्तर प्रदेश) या संस्थेमार्फत केंद्रीय चित्रपट ग्रंथालय चालवले जाते, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या साहाय्याने हा कार्यक्रम चालवला जातो.
एनसीईआरटी बारावीपर्यंतचे सीबीएसईची पाठ्यपुस्तके प्रकाशीत करते.प्रकाशनासाठी 'एनसीइआरटी'ची तीन प्रादेशिक प्रकाशन केंद्रे आहेत- अलाहाबाद, कलकत्ता, बंगळुरू. प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी,हिंदी व उर्दू भाषेतून प्रकाशित केली जातात. तसेच 'एनसीइआरटी' -
द सायन्स टीचर,
द प्रायमरी टीचर, जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -