मुख्य सामग्रीवर वगळा

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा 2023@ NEP 2020 ..#शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन: -

 - शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन: -

------------------------------

NEP2020---

   शालेय संकुलात उपलब्ध साधने एकमेकासोबत वाटून घेता यादीत व शालेय अनुशासन अधिक स्थानिक ,प्रभावी व कार्यक्षम व्हावे या उद्देशाने शाळांना शालेय संकुल गटबद्द करण्यात आलेआहे . सध्या अनेक शासकीय शाळांना विशेष त्या छोट्या शाळांना साधनाची टंचाई जाणवत असल्याची समस्या समोर आली आहे ,

शालेय संकुलाची उभारणी केल्या मुळे हा प्रश्न निकालात निघेल. त्यांचे भौगोलिक स्थलांतर न करताही त्या एकाच  संस्थात्मक प्रशासकीय छताखाली आणल्या जातील. त्यामुळे मुलांसाठी कोणतीही तडजोड किंवा गैरसोय  निर्माण न होता अतिशय प्रभावी व कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात येईल.

२०२३पर्यंत राज्य शासन लोकसंख्येचे प्रमाण संधानाता व इतर  स्थानिक मुद्द्यांचा विचार करून शाळांना विविध शालेय संकुलामध्ये गटबद्ध करेल ,गटबद्ध कण्याच्या या उपक्रमामध्ये  विद्यमान शाळांच्या अवस्थांचे पुनर्विलोकन करून ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या अतिशय कमी आहे ( उदा .20 पेक्षा कमी विद्यार्थी) अशा शाळांचे विलिनीकरण करण्यात येईल, मात्र असे करताना मुलांना शाळेमध्ये ये
- जा करण्यात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून दळणवळणाची आवश्यक सुविधा पुरवण्यात येईल, या माध्यमातून राज्य शासनाला विद्यमान शाळांच्या अवस्थेची छाननी करण्याची ही संधी मिळेल.  शालेय संकुलामुले मुख्य प्रवाहां पासून  वेगळ्या पडलेल्या छोट्या  शाळाचा अलगपणा नाहीसा होईल आणि शैक्षणिक दृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या एकत्रित  काम करण्यासाठी व एकमेकांना साहाय्य करण्यासाठी  शिक्षकांचा  प्राचार्यांचा एक विशाल समुदाय निर्माण होईल ,शासकीय शालेय प्रणालीसाठी शालेय संकुल हे प्राथमिक प्रशासकीय युनिट असेल.

एखाद्दे विशिष्ट शालेय संकुल म्हणजे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या किंवा एकसंघ असलेल्या प्रदेशातील 10 - 20 शासकीय शाळांचा समूह असेल .त्या ठिकाणी शिक्षणाच्या  पायाभूत स्तरापासून ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण प्रदान करण्यात येईल माध्यमिक शाळेचे प्राचार्य या शालेय संकुलाचे प्रमुख असतील.

एखाद्या विशिष्ट शालेय संकुल म्हणजे निम - स्वायत युनिट ,असेल ज्यामध्ये शिक्षणाच्या पायाभूत स्तरा पासून ते इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण प्रदान करण्यात येईल , यामध्ये एक माध्यमिक शाळा असेल  (इयत्ता नववी ते बारावी )आणि त्यांच्या आसपास सर्व शासकीय शाळांमधून मूलभूत प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण प्रदान करतील.

शाळांना शालेय संकुलामध्ये गटबद्ध केल्यामुळे विषयाचे शिक्षक ,क्रीडा, संगीत व कला शिक्षक, समुपदेशक आणि समाज सेवक यांच्यासह सर्वसाधान  सुविधा शाळांना एकमेकांसोबत गरजेनुसार वाटून घेणे शक्य होईल .याशिवाय या  एकत्रीकरणामुळे  प्रयोगशाळा, ग्रंथालय ,आय .सी .टी .संगीत वाद्य, क्रीडा उपकरणे व भौतिक साहित्य एकमेकासोबत नियोजनबद्ध पद्धतीने वाटून घेणे शक्य येईल परिणामी सार्वजनिक साधन सुविधांचा इंष्टतम  विनियोग होईल.

प्रारंभीक  तीन वर्षाचे पायाभूत शिक्षण देणाऱ्या शाळा ,व्यावसायिक शिक्षण व प्रोढ शिक्षण  देणाऱ्या संस्था, शिक्षक साहित्य संस्था व एकमेकांशी भौगोलिक दृष्ट्या जवळ असलेल्या किंवा जोडलेल्या परिसरातील दिव्यांग मुलांना सांगत देणे एकमेकांच्या कामांमध्ये साहाय्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधांचा सलग्न  संच तयार करणे ,हा शालेय संकुल निर्मितीमागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे .जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्था याबाबत सर्वतोपरी सहाय्य करतील.
प्रत्येक संकुलासाठी सर्वसमावेशक शिक्षक विकास आराखडा करण्यात येईल जाणीवपूर्वक विकसित केले जातील व साप्ताहिक बैठका ,शिक्षक अध्ययन केंद्र अशा प्रक्रियांमधून त्याला शाश्वत ठेवण्यात येईल , यासोबत परिसंवाद ,वर्गातील ,देखरेखीतून  मार्गदर्शन, अनुभव भेटी, इत्यादीतून सातत्याने व्यावसायिक विकास घडवून आणण्यात येईल . जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि ब्लॉक, कल्स्टर रिसर्च सेंटर यांच्यासह शैक्षणिक व शिक्षक साहाय्य प्रणाली ही शालेय संकुल प्रणालीशी सुसंगत करण्यात येईल.
प्रत्येक शालेय संकुलामध्ये एक शालेय संकुल व्यवस्थापन समिती असेल ज्यामध्ये संकुलातील सर्व शाळांचे त्यांच्यासोबत प्रौढ   प्रशिक्षण केंद्र  ,गटसाधन केंद्र इत्यादी संकुलाची संलग्न असणारे इतर संस्थांचे प्रतिनिधीही असतील .शाळेच्या वतीने  राज्य शासन तिच्या  समित्या त्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार या समितीला असेल, सदर समिती शिक्षकांच्या कामगिरीच्या  मूल्यमापनामध्ये ही मोलाची व मध्यवर्ती भूमिका पार पाडेल.
प्रारंभी प्रत्येक शाळा स्वतःचा विकास आराखडा तयार करतील,


 त्या वरून शालेय संकुलाचा विकास आराखडा आखण्यात येईल तत्पच्चात त्याला शालेय शिक्षण विभागाकडून अनुमोदक देण्यात येईल. शालेय प्रणालीच्या देखरेखीसाठी व  त्याचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्या सबलीकरण यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण परिषद स्थापन करण्यात येईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.