मुख्य सामग्रीवर वगळा

#जेष्ठ पौर्णिमा

जेष्ठ पौर्णिमा बुद्धगयेपासून सुमारे दोन मैलावर निरंजना नदी वाहते, एलतिरावर  गया तर पैलतीरावर पूर्वेला उरुवेला नामक एक अतिशय सुंदर गाव आहे, त्याच्या छायेतच सेनानी नावाचे छोटेसे खेडे वसलेल्या आहे, या ठिकाणी सेनानी नावाचा एक प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्ति राहत असे तिच्या नावावरूनच या गावास सेनानी नाव पडले ,त्याच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्याला ग्वालराज म्हणत.. सेनानीच्या विवाहाच्या काही वर्षानंतर त्याच्या कुटुंबात कन्या जन्मास आलि तिचे नाव "सुजाता" होते.                         त्या गावी   असलेल्या वटवृक्षाची अशी ख्याती होती की, जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांचीत फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ,एके दिवशी श्रद्धावान सुजातानेही वटवृक्षरुपि या              वृक्षराजाची पूजा करून इच्छा प्रगट केली की, जर मला सुंदर -सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि त्याच्यासोबत पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्रप्राप्ती होईल तर मी निर्जल दुधाची "मधुपायस" चढून पूजा करेल. हीच तिची इच्छा पूर्ती झाली म्हणून एका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या पात्रात खीर घेऊन ती वटवृक्षाखाली गेली. पाहते तर काय तेथे बोधीसत्व ध्यानस्थ बसलेले ,अनेक दिवसांपासून अन्नग्रहण न केल्यामुळे अस्थिपंजर झालेले ,ही वनदेवताच माझे नैवद्द स्वीकारण्यास अवतरली आहे असे सुजाताच वाटले. तिने वनदेवतेस विनवले की, कृपया करून माझे नैवद्द स्वीकारावे ,तपश्चर्येस ध्यानस्थ बसलेले बोधिसत्व म्हणाले भद्रे! मी वनदेवता नसून एक सामान्य मानव आहे. सत्याचा साक्षात्कार करून दुःख मुक्तीचा मार्ग शोधत आहे; "सत्याचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे".असे अभिवचन बोधिसत्त्वा कडून घेऊन खीरीचे स्वर्ण पात्र मनोभावे त्यांना अर्पण करून सुजाताने सिद्धार्थ वंदन केले व परत गेली.. या "खीर" दाणा नंतर गौतम सिद्धार्थाने निरंजना नदीवर जाऊन स्नान केले अनेक दिवसाच्या उपासानंतर त्या खिरीचे एकूण  ऐकोपन्नास ग्रासात सेवन केले ..उपासतापास व्रतवैकल्ये व क्केशाने शरीर क्षय करून सत्य सापडत नाही अशी, त्यांची खात्री झाली. आणि नव्याने  त्यांनी दुःख निवारण व साक्षात्काराच्या शोधार्थ प्रयास आरंभ केला ..   पुढे  जेव्हा बोधिसत्वास गया येथे बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांना सुजाता दिलेल्या  वचनाची आठवण झाली व त्या वचन पुर्तीसाठी त्यांनी परत सुजाताचा शोध घेऊन तिला तिच्या पतीस व पुत्र यश यास धम्मदीक्षा दिली.    सुजाताचा विवाह वाराणसीत झाला होता वाराणसीचे हे एकमेव कुटुंब होते की, ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार दीक्षा ग्रहण केली. सुजाता ही एक अशी महिला होऊन गेली की, तिच्या संबंधात सम्यक संबुद्धानी स्वतः म्हटले की, माझ्या उपासिका मध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे ,सहपरिवार सुजाताला दीक्षित केलेला तो दिवस म्हणजेच "ज्येष्ठ पौर्णिमेचा"होता.
 धम्माचा "दायक" बनण्याच्या इच्छेपोटी महाराज अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बोलावून विचारले काय आपण दोघेही "प्रवज्जा" ग्रहण कराल?मुलांनी उत्तर दिले ,देव!जर आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवजीत होऊ "प्रवज्जा" ग्रहण करण्याने आमचे व आपले कल्याण होईल असे आम्हाला वाटते, या कुशाग्रवादी व बलवान मनाने स्वामी असलेल्या बालकांचा दीक्षाविधी अतिशय समारंभपूर्वक व धुमधडाक्यात पार पडला .सम्राट कन्या संगमित्रा व पुत्र  महेंद्र धन्य होत, त्यांनी केवळ आपल्या पित्याच्या इच्छे खातिर गृहस्थ जीवनाचा त्याग करून "प्रवज्जा" घेतली जेव्हा महामिती महेंद्रस प्रवर्तित होऊन बारा वर्षे पूर्ण कालावधी झाला होता 'तेव्हा उपाध्यायने आणि संघाने मनोरम लंका द्वीपमध्ये जाऊन बुद्धधम्माच्या स्थापनेची आज्ञा केली, ती शिरसावंद्य मानून महेंद्राने उपाध्याय आणि संघास वंदन करून चार स्तवीर सोबत घेऊन बौद्ध धम्माच्या स्थापना, प्रचार आणि प्रचारासाठी लंकाद्वीप  गाठले  तो दिवस "जेष्ठ पौर्णिमेचा" होता!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.