मुख्य सामग्रीवर वगळा

बालस्नेही महाराष्ट्र

संत चोखामेळा , संत कवी...

संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...

*बुद्धाची विपश्यना

 *बुद्धाची विपश्यना*

🏵️🏵️🏵️

सर्वानाच सुख आणि शांती हवी असते, कारण की आमच्या जीवनांत खरोखरच सुख आणि शांती नसते. आपण सर्वच वेळोवेळी द्वेष,क्रोध,भय,ईर्षा इत्यादि कारणामुळे दुःखी होतो. आणि जेव्हा आम्ही दुःखी होतो तेव्हा ते आपल्यापुरतेच मर्यादित  ठेवत नाही तर ते दुःख दुसऱ्यानां  देखील वाटतो. जेव्हा कोणती व्यक्ती दुःखी होते तेव्हा आसपासचे वातावरण देखील अप्रसन्न बनविते,आणि त्या व्यक्तिच्या संपर्कात येणाऱ्या  व्यक्तिंवर देखील परिणाम होतो. खरोखरच, हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग नाही.आपण स्वतःही शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे अगत्याचे आहे. शेवटी आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला समाजात राहावे लागते आणि समाजातल्या अन्य व्यक्तींबरोबर पारस्पारिक संबंध ठेवावे लागतात. अशा स्थितीत आपण शांतीपूर्वक जीवन कसे जगू शकतो? कसे आपण आपल्या आतमध्ये सुख तसेच शांतीचे जीवन जगू शकतो, आणि कसे आपल्या आसपासही शांती आणि  सौहार्दाचे वातावरण निर्माण शकतो, जेणेकरून समाजातले अन्य लोकही सुख आणि शांतीचे जीवन जगू शकतील? आपले दुःख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की आपण अशांत व बेचैन का होतो. ह्याकडे लक्ष देऊन पाहिले तर लक्षांत येईल की जेव्हा मन विकारामुळे विकॄत होऊन जाते तेव्हा ते मन अशांत होऊन जाते. आपल्या मनांत विकारदेखील आहेत आणि त्याचवेळी आपण सुख तसेच शांतीचा अनुभव घेऊ, हे अशक्य आहे.हे विकार का आणि कसे उत्पन्न होतात? पुन्हा खोलवर शोध घेतल्यास हे स्पष्ट होते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला न आवडणारा व्यवहार करते किंवा जे घडते ते आपल्याला आवडत नाही, ह्याची ती प्रतिक्रिया असते. अप्रिय घटना घडतात आणि आपण आंतरिक तणाव निर्माण करतो. मनाप्रमाणे न होण्यामुळे, किंवा मनाप्रमाणे होण्यात काही बाधा येत असेल तर आपण तणावग्रस्त होतो आणि अंतरमनांत गांठी बांधायला सुरूवात करतो.जीवनभर अप्रिय घटना होत रहातात, कधी मनाप्रमाणे होतात, कधी होत नाहीत, आणि आपण जीवनभर प्रतिक्रिया करत राहतो आणि गांठी बांधत राहतो. आपले पूर्ण शरीर तसेच मन इतक्या विकारांनी, इतक्या तणावांनी भरून जाते की आपण दुःखी होऊन जातो.ह्या दुःखापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की आपल्या आयुष्यात अप्रिय घटना घडूच द्यायची नाही, सर्वकाही मनाप्रमाणे व्हावे. किंवा आपल्याला अशी शक्ती जागृत करायला हवी, किंवा अशी शक्ती असलेला दुसरा कुणी मदतकर्ता असावा जो नको असणाऱ्या घटना घडूच देणार नाही आणि आपल्याला हवे असलेलेच होत जाईल. परंतु हे अशक्य आहे. जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याच्या सर्व इच्छा सर्वकाळ पूर्ण होतील, ज्याच्या आयुष्यांत सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडत राहील, अगदी मनाविरूद्ध काहीही न होता. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मनाविरुद्ध घटना घडतच राहणार. अशा वेळेस प्रश्न की, विषम परिस्थिती ऊत्पन्न झाल्यावर आपण अंध प्रतिक्रिया देणे कसे थांबवावे? कसे आपण तणावग्रस्त न होता शांत आणि संतुलित राहू शकू?भारत तसेच भारताबाहेरील देशांतसुद्धा  ह्या समस्येचा अभ्यास केला, मानवी जीवनांतील दुःखाच्या समस्येचा शोध घेतला आणि उपाय सांगितला की जर काही मनाविरुध्ध घडले तर मनामध्ये क्रोध, भय किंवा अन्य विकाराची प्रतिक्रिया उत्पन्न झाला तर शक्यतो लवकर आपले मन दुसऱ्या कशांत तरी गुंतवावे. तुमचे मन दुसरीकडे गुंतेल आणि काही प्रमाणांत तरी तुम्ही विकार व क्रोधापासून मुक्त व्हाल.परंतु हा उपाय केवळ वरवरच्या जाणिव असलेल्या स्तरांवरच काम करतो. वस्तुतः मन दुसरीकडे गुंतवून आपण विकारांना अंतरमनाच्या खोलवर दाबून ठेवतो, जेथे त्याचे प्रजनन आणि संवर्धन चालूच राहते. मनाच्या वरच्या स्तरावर शांती आणि सौमनस्याचा लेप लागतो,परंतु अंतर्मनांत खोलवर दाबलेल्या विकारांचा सुप्त ज्वालामुखी तसाच राहतो, ज्याचा आता किंवा नंतर वेळ आल्यावर स्फोट होऊन ऊद्रेक होणारच.आंतरिक सत्याचा शोध घेणाऱ्या काही वैज्ञानिकांनी त्याच्या पुढे जाऊन शोध घेतला. आपले मन आणि शरीराच्या सत्यतेचा आंतरिक अनुभव घेतला आणि पाहिले की मनाला दुसरीकडे गुंतवून फक्त मूळ समस्येपासून दूर पळून जाणे आहे. खरोखरच पलायन करणे हा यावर उपाय नव्हे, तर त्या समस्येला सामोरे जायला हवे. जेव्हा मनामध्ये विकार उत्पन्न होईल तेव्हा फक्त पाहा आणि त्या समस्येला तोंड द्या. मनातील विकारांना पाहणे सुरु करताच तो क्षीण होत जाईल आणि हळूहळू त्या विकाराचा क्षय होत जाईल.हा चांगला उपाय आहे. ह्यात दाबून टाकणे आणि मोकळे सोडणे या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळल्या जातात. अज्ञात अवस्थेंतील अंतरमनांतील विकाराना दाबून टाकण्याने त्याचे निर्मूलन होत नाही, आणि विकारांना अहितकारक अशा शारीरिक तसेच वाणीच्या कर्मांना मोकळी सूट देण्याने समस्या आणखी वाढतात. परंतु तुम्ही जर विकाराकडे पाहत राहाल तर त्याचा क्षय होईल आणि त्यापासून मुक्तता मिळेल.बोलणे एकदम सोपे आहे,परंतू करणे एकदम कठीण. आपल्या विकाराला तोंड देणे एव्हढे सोपे नाही. जेव्हा क्रोध उत्पन्न होतो, तेव्हा अशाप्रकारे आपल्यावर स्वार होतो की आपल्याला ते समजत सुद्धा नाही. क्रोधाने व्याकूळ होऊन, शारीरिक तसेच वाणीव्दारे आपण असे काम करतो की त्याने आपली तर हानी होतेच, पण दुसऱ्यांची देखील. जेव्हा क्रोध जातो तेव्हा आपण रडतो आणि पश्चात्ताप करतो, ह्या किंवा त्या व्यक्तिची किंवा भगवंताची क्षमायाचना करतो-- माझ्याकडून चुक झाली, मला माफ कर. परंतु जेव्हा पुन्हा अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा आपण तशीच प्रतिक्रिया करतो. पुन्हा पुन्हा पश्चात्ताप करण्याने काहीही फायदा होत नाही.आपलेी अडचण ही आहे की जेव्हा विकार उत्पन्न होतो तेव्हा आपण विवेकबुध्दी घालवून बसतो. विकाराचा उद्गम अचेतन मनाच्या तळस्पर्शी खोलांतील अवस्थेतून होतो आणि जेव्हा तो सदसव्दिवेकतेपर्यंत पोहोचतो तेव्हा इतका बलवान होऊन आपल्यावर स्वार होऊन जातो, की आपण त्याला पाहू देखील शकत नाही.समजा आपल्याला शहाणपण आले आणि आपण त्याला दम भरला नाही, आणि म्हणालो चांगले सांगितलेस. आता मी त्याकडेच पाहीन, त्या प्रती साक्षीभाव ठेवीन. पण हे शक्य आहे का? जेव्हा डोळे बंद करुन क्रोध पाहण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तेव्हा ज्यामुळे क्रोध आला तीच गोष्ट, तीच व्यक्ति, तीच घटना मनामध्ये परत परत येइल. मी क्रोध बघणार नाही तर त्याचे उगमस्थानच पहात राहीन. त्यामुळे क्रोध आणखीच वाढत राहील. म्हणुनच हा काही उपाय नाही. आलंबन बाजूला ठेऊन फक्त विकाराकडे पाहाणे अजिबात सोपे नसते.

 विपश्यना  ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली बौद्ध धर्माची  ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना या नावाने ही ध्यानपद्धती जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय. भगवान बुद्धानी ८४००० उपदेश दिले आहेत, पाली भाषेत "विपस्सना' शब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. विपस्यना  -seeing clearly spiritual insight ,विपसस्सति –to see clearly to obtain spiritual insight ,विपसस्सी- seeing clearly wise ,आनापान –inspiration -Respiration .मनाच्या दुष्य परिणामामुळे मनाचे व शरीराचे विकार होतांत हे होमिओपॅथीचे जनक डॉ .सेम्यूअल हनिमान यांच्या “ऑरगनन ऑफ मेडिसिन”या ग्रंथावरून जगाला माहीत झाले ,पुष्प औषधी  चे जनक डॉ ,बच यांनी मनाच्या स्वभावानुसार  औषध  शोधली आहेत  मनाला केंद्रीभूत केले ,परंतु मनाला व चित्ताला केंद्रस्थानी माणूस विपश्यना द्वारे चित्त -  निर्मल  करण्याचे महान वैज्ञानिक  तथागत भगवान बुद्धा नी विपश्यनेची औषध  २५०० वर्षापूर्वीच  जगाला दिली आहे ,गौतम बुद्धानी  स्वतः  या ध्यानपद्धतीचा अभ्यास करून; तिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे  आहे. गौतम बुद्धानी  स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही ध्यान पद्धती आचरली गेली, भिखू गीरीमांनद जेव्हा गंभीर आजारी होते तेव्हा आनंदाने  भागवतांना  सांगितले त्यावर भगवान बुद्धांनी गीरीमीनंदाला आनापानंसाती अनुपस्यना करण्याचा  उपदेश दिला तीच विपश्यना आहे,संवेदनाच्या रूपाने प्रकट होणारे सततचे परिवर्तनशील अशा मन आणि शरीराशी परस्पर संबंधांना सुव्यवस्थित प्रकारे तसेच समतेसह पाहताना आपल्याबाबतीतील सत्याचा अनुभव करणे.हाभगवानबुद्धाच्याशिकवणीचा कळसआहे,आत्मनिरीक्षणाव्दारेआत्मशुद्धीसर्वजण ह्याचा अभ्यास करू शकतात. सर्वच दुःखी आहेत. ह्या विश्वव्यापी रोगाचा उपाय देखील सांप्रदायिक नव्हे तर विश्वव्यापी झाला  पाहिजे. जेव्हा कुणाला क्रोध उत्पन्न होतो तेव्हा तो कोणत्या धर्म संप्रदायाचा नसतो . क्रोध हा क्रोधच असतो. क्रोधाच्या कारणाने जी व्याकुळता येते त्याला  कोणत्याही धर्माची म्हणता येणार नाही. हा रोग विश्वव्यापी आहे. त्यामुळे त्याचा इलाज देखील विश्वव्यापी  हवा.

 मंगल हो !!

संकलन –

मनोज चौरपगार  ९४०३६१८९९१

 🌷🌷🌷🌷🌷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ताम्हण :-महाराष्ट्राच्या अस्मितेचं फुल

" ताम्हण – महाराष्ट्राच्या अस्मितेचं फूल" १ मे महाराष्ट्र दिन!  हा दिवस फक्त राज्य स्थापनेचा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अभिमानाचा आणि निसर्गदत्त संपत्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवशी आकाशात मराठी अस्मिता गर्जते, आणि जमिनीवर निसर्गाचं एक अनमोल दागिना , ताम्हणाचं फूल बहरतं. म्हणूनच महाराष्ट्राने ताम्हणाला आपलं "राज्य फूल" म्हणून सन्मानित केलं आहे. या फुलामध्ये आहे सौंदर्य, सत्त्व, औषधी गुण आणि पर्यावरणाशी असलेली नाळ. शास्त्रीय नाव जरुल, राजश्री,आहे, हा एक मध्यम उंचीचा, पानझडी वृक्ष असून त्याला लांबट पाकळ्यांचे, जांभळसर, गुलाबी किंवा लालसर फुलांचे मोठाले गुच्छ येतात. याची पाने गडद हिरवी असून उन्हाळ्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी वसंताच्या उत्तरार्धात त्यावर फूलांचा साक्षात उत्सव फुलतो.ताम्हण फुलांचा बहर एप्रिल शेवटी ते मेच्या सुरुवातीला सुरू होतो. म्हणूनच १ मे  महाराष्ट्र दिनाच्या सुमारास संपूर्ण झाड रंगीबेरंगी फुलांनी नटलेले दिसते. जणू हे फूल महाराष्ट्राला संस्कृतीचा मुकुट चढवते. ताम्हणाचे फुलं रंगाने उठून दिसणारी, आकर्षक आणि अभिजाततेचं प...

#ऑल इज वेल @ All is Well

तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ? ---------------------------------------------- आई? वडील? पत्नी? मुलगा? नवरा? मुलगी? मित्र? ह्यापैकी कुणीही नाही. तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर. शरीर संपत्ती."Health is wealth" ए कदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं. तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.  तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.  तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते. हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.  तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात. स्वस्थ रहा....

Anaabhau sathe.."अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना”

अण्णाभाउंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना” अण्णाभाऊ साठे यांचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना आहे, कृष्णाआणि वारणा नदीच्या कुशीत विसावलेला वाटेगाव या गावी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठेयांचा जन्म झाला, त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई .अण्णाभाऊ च्या जन्माच्या वेळी फकिराने  इंग्रजी खजिना लुटला  होता .फकीरा हा खजिना  गोरगरिबांना वाटत असतानाच अण्णाभाऊ च्या जन्माची बातमी  त्याच्या कानावर पडली .त्यामुळे फकिराने दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटी टाकले,फकिराच्या बंडखोरीतुंन मिळालेल्या पैशातूनच अण्णा भाऊंना  पहिली जन्म घुटी पाजण्यात   आली . फकीरा तील कैफियत मध्ये अण्णाभाऊंनी हा प्रसंग लिहिला आहे.  अण्णाभाऊंना वयाच्या १२ व्या  वर्षी  अन्नाच्या शोधात आई वाडीला सोबत मुंबईची वाट धरावी लागली ,त्या वाटेवर असताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या ,अण्णाभाऊ चे बालपण १९३१ मध्येच संपले , जगण्याची भीषण वाट वाटेगाव ते मुंबई  प्रवास संकटांना तोंड देत अनेक प्रकारची कामे करत जावे ...