मुख्य सामग्रीवर वगळा

#पाणी & आपण

पृथ्वीवर वास्तव्य करणारे आम्ही निसर्गाने अगदी मोफत दिलेल्या अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व जाणतो का? म्हणतात की पाणी जेवढे प्याल तेवढे कमीच आहे. परंतु, ही बाब खरोखरच पूर्णपणे सत्य आहे का, असे विचारले तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील आरोग्यास घातक ठरू शकते. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे केव्हाही धोकादायकच आणि पाणीदेखील त्याला अपवाद नाही. पाणी कार्बोहायड्रेट्स, प्रोटिनसारखे पोषणाचे काम करत असते.

जिवांना ज्या वस्तूची ज्या अनुपातात गरज असते निसर्गाने ते तत्त्वही त्याचा अनुपातात उपलब्ध करून दिले आहे. परंतु, सध्याचा विचार करता पाणी आणि वायू या दोन्ही गोष्टींबाबत गंभीर संकट निर्माण झाले असेल तर आम्ही नक्कीच कुठे ना कुठे चूक केली हे समजून घेण्याची गरज आहे. पाणी हा तरल पदार्थ आहे जो ठोस आणि वायू स्वरूपातही उपलब्ध आहे. 

पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानवासह भूतलावर असलेल्या सर्वच प्राण्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, असे असले तरी पिण्याचे स्वच्छ पाणी खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सुरक्षित पाण्याचा अभाव म्हणजेच दुष्काळ. आजही देशाच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा दुष्काळ असून, त्या भागातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे हे एक फार मोठे आव्हान आहे. पाण्याच्या अभावामुळे लोकांना अनेक दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागते. दुष्काळी भागातील लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खूप प्रयत्न, पैसा आणि वेळ लागतो. केवळ भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ज्या लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्यांना आपण दररोज अनावश्यक कारणांसाठी जो पाण्याचा अपव्यय करतो त्याचे महत्त्वच लक्षात येत नाही.

आपणा सर्वांना याची कल्पना असेलच की, पृथ्वीवरील फक्त दोन टक्के पाणी शुद्ध आणि मानवाने सेवन करण्यासाठी उपयुक्त आहे. बहुतांश पाणी ग्लेशियर, बर्फ आणि इतर खुल्या स्रोतांमध्ये अडकले आहे. भूजल हा शुद्ध पाण्याचा मुख्य स्रोत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिथे पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नैसर्गिक प्रक्रिया उपलब्ध असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान बदल, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग या विविध कारणांमुळे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली जात असून, नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे स्वच्छ पाण्याची अनुपलब्धता वाढत आहे. वाढती लोकसंख्या, कृषी व औद्योगिक क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता येणार्या दशकांमध्ये स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याच्या मागणीत वाढ होणार हे निश्चित.

ही बाब लक्षात घेता शक्य तेवढे पाणी वाचविण्यासाठी आम्ही एकत्र येऊन प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. दैनंदिन जीवनात पाणी वाचविण्याचे अनेक उपाय आहेत. जल संवर्धनाच्या वेगवेगळ्या पद्धतींनुसार पाणी वाचविले जाऊ शकते. वर्तमान आणि भविष्यातील गरज भागवायची असेल तर पाणी वाचविण्यासह ते प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. येणार्या पिढ्यांना पाणी उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्यासाठी आज ते वाचविणे आवश्यक आहे. जर आम्ही आजच या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर नैसर्गिक स्रोतांपासून मिळणार्या शुद्ध पाण्याची कमतरता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याची गरज कमीत कमी करुन आम्ही केवळ मानवालाच नव्हे, तर शुद्ध पाण्याचे स्रोत, स्थानिक वन्यजीव आणि स्थलांतरित पक्ष्यांनाही वाचवू शकतो. यादृष्टीने पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब वाचविण्यासाठी आम्हाला आमच्या सवयींमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील.
पाणी पिण्याचे फायदे:-
१)सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिणं गरजेचं असतं. पाणी न पिताच चहा किंवा कॉफी प्यायल्याने पित्त, गॅस किंवा इतर अनेक समस्या निर्माण होवू शकतात. शरीरात ७० टक्के पाणी असतं.
शरीराचं कार्य सुरळीत चालण्यालाठी पाणी गरजेचं असतं. खरं तर रात्री आपण झोपलो असलो तरी आपल्या शरीरात अनेक प्रक्रिया सुरु असतात. शरीरातील रासायनिक प्रक्रियेसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने सकाळी उठल्यानंतर आधी चहा कॉफी किंवा ज्यूस पिण्याएवजी साधं पाणी पिणं हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.शरीर स्वच्छ होण्यास मदत- पाणी हे एखाद्या क्लिंजरप्रमाणे आपल्या शरीरात काम करतं. सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्य़ाने शरीरात साचलेले टॉक्सिन म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

२)त्वचेवर चमक येते- सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. पाण्यामुळे रक्तप्रवाह वाढण्यास आणि नव्या रक्तपेशी तयार होण्यास मदत होत असल्याने त्वचेवर skin glow येतो. तसचं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

३. चयापचय क्रिया सुधारते- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यावने चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होवू शकते. त्यामुळेच ज्यांन वजन कमी करायचं आहे. त्यांनी सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं गरजेचं आहे.

४)मूतखडा आणि युरीन इंफेक्शनचा धोका कमी- पाण्यामुळे पोटातील आम्लता कमी होवून मूतखड्याचा धोका कमी होते. तुम्ही सकाळी उठून जितकं पाणी प्याल तितकेच विषारी पदार्थ तुमच्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होईल. यामुळे युरीन इंफेक्शनचा धोका कमी होईल.

५. बद्धकोष्ठता होईल दूर- बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्यांनी सकाळी उठल्यानंतर किमान २ ग्लास तरी पाणी प्यावं. नियमितपणे पाण्याचं सेवन केल्यास लवकरच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यामुळे मल उत्सर्जनास कोणताही त्रास देखील होणार नाही.
@बालस्नेही
#Drink water 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.