मुख्य सामग्रीवर वगळा

बालपण दे गा देवा..

मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना बालपणात वेगवेगळे अनुभव घेता यावेत, जेणेकरून त्यांचा विकास चांगला होईल यासाठी प्रत्येक पालकाने त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावली पाहिजे.
कारण त्याचे अनेक प्रकारे फायदा मुलांना होतात.सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाहेर खेळल्याने मुलांचा व्यायाम होतो.
यामुळे त्यांचा शारीरिक विकास योग्य पद्धतीने होते. त्यांचे टीव्ही बघणे, गेम खेळणे कमी होते.याव्यतिरिक्त सुद्धा बाहेर खेळण्याचे मुलांच्या मानसिक विकासासाठी अनेक फायदे आहेत.
@Childhood
 मुलांना सामाजिक भान येते 
समजा जर तुम्ही मुलांना घरीच ठेवले तर त्यांना बाहेर, चार लोकात कसे वागायचे याची समज येणार नाही.
@yoga
बाहेर गेल्यावर काय करायचे, काय नाही हे त्यांना शिकवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे त्यांना बाहेर घेऊन जाणे किंवा त्यांना बाहेर सोडणे.लोकांशी कसे बोलायचे, आपल्याला काही आडले तर लोकांना मदत कशी मागायची याचे प्रात्यक्षिक त्यांना मिळते.तुमची जर लहानशी फॅमिली असेल तर याचा विशेष उपयोग होईल.
परिवारात जर जास्त सदस्य नसतील तर इतरांशी मिळून-मिसळून कसे वागायचे हे मुलांना माहीत नसते.
त्यांना जर बाहेर सोडले तर ते आपणहून चार लोकांशी बोलतात.
यामुळे त्यांचा परीघ विस्तारित होतो. केवळ आपले घर, आपले आईबाबा हेच जग नाही, याची जाणीव त्यांना होते.
यामुळे ते दुसऱ्यांचा विचार करायला शिकतात, इतरांच्या भावनांना किंमत द्यायला शिकतात. 
मुलांमध्ये ‘टिम स्पिरीट’ निर्माण होते 
बाहेर न जाता घरात मुले एकटीच खेळत असतील तर त्यांना होणारा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे त्यांना मग इतर मुलांबरोबर जवून घ्यायला कठीण जाते.
(friends for each other)
त्यांचे मित्र लवकर होत नाहीत. त्यांना स्वतःपुरताच विचार करायची सवय लागते.
इतर मुलांशी खेळ किंवा खाऊ वाटणे त्यांना अवघड जाते. ती एकलकोंडी होतात. 
याउलट जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच बाहेर खेळायची सवय लावली तर त्यांना इतर मित्र मैत्रिणी मिळतात.आपल्या वस्तू वाटून घ्यायचे भान त्यांच्यात येते.मुख्य म्हणजे चार मुलांशी मिळून-मिसळून खेळताना त्यांच्यात टीम स्पिरीट निर्माण होते.
आयुष्यात प्रगती करायची असेल तर या टिम स्पिरीटचा उपयोग होतो. 
हे स्पिरीट त्यांना फक्त लहानपणीच नाही तर आयुष्यात पुढे, अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा उपयोगी पडणार असते.
(Play games and live fit)
मुलांना आयुष्याचे धडे गिरवायला मिळतात मुलांना शास्त्र, गणित, इतिहास, भूगोल असे विषय शाळेत शिकवता येतात पण अनुभवांचे काय?
ते काही त्यांना शिकवता येत नाहीत.
मुले जर बाहेर पडलीच नाहीत, चार मुलांबरोबर बाहेर, मैदानी खेळ खेळलीच नाहीत तर त्यांना वेगवेगळे अनुभव कसे येतील?
त्याचे जगणे बंदिस्त होऊन जाईल.
मुले प्रत्येक गोष्ट टिपत असतात. इतरांच्या वागण्याचा बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो.
यामुळे इतरांच्या मनात काय आहे हे ओळखणे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे या गोष्टी ते आपसूकच शिकतात. 
मुलांना प्रत्यक्ष उदाहरणातून शिकायला मिळते पुस्तकात वाचून शिकणे आणि प्रत्यक्षात अनुभव घेऊन शिकणे यात पुष्कळ फरक आहे.
मुले बाहेर पडून मैदानी खेळ खेळत असतील तर त्यांना मातीचे प्रकार, दगडाचे प्रकार, हवामान, निसर्ग, प्राणी, पक्षी, फुले या गोष्टी प्रत्यक्ष बघून शिकता येतील.
बाहेर खेळल्याने त्यांचे कुतूहल वाढेल. यामुळे ते सुद्धा अभ्यासात जास्त लक्ष घालायला बघतील.
वर्गात शिकवलेले धडे त्यांना बाहेर मैदानात अनुभवायला मिळतील.
(Daily education for good life)
यामुळे त्यांचा अभ्यास सुद्धा पक्का होईल आणि त्यांची प्रगती होत राहील. 
मुलांच्या मनावरचा ताण दूर होतो 
जसे तुम्हाला अनेक चिंता असतात, स्ट्रेस असतात अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस असतो.
त्यांच्या मानसिक विकासावर या स्ट्रेसचा परिणाम होत असतो.
असूया, असुरक्षितता, भीती यासारख्या अनेक भावना मुलांच्या आत असतात. यामुळे त्यांना स्ट्रेस येतो.
पण बाहेर मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराला व्यायाम होतो आणि त्यांच्या मनावरचा ताण दूर व्हायला मदत होते. 
मुलांची कधीकधी चिडचीड होत असते, त्यांना सुद्धा राग अनावर होऊ शकतो.
अशावेळी त्यांच्यावर ओरडणे हा उपाय नसतो. तर त्यांच्या भावनांना मोकळे करून देणे हा योग्य उपाय आहे.
पण हे कधी होईल? जर त्यांच्यात असलेल्या उर्जेला योग्य वाट मिळाली तर.
बाहेर मैदानी खेळ खेळल्यामुळे त्यांच्या शरीरातील उर्जा योग्य ठिकाणी खर्च होते त्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी होतो. 
आईबाबांनो, मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, प्रगती करण्यासाठी चांगले मार्क मिळवून चांगले शिक्षण घेणे जसे गरजेचे आहे तितकेच गरजेचे आहे वेगवेगळे अनुभव घेऊन अनुभव संपन्न होणे.
जर मुलांना चार चौघात मिसळता येत नसेल, टीम बरोबर काम करताना अडचणी येत असतील तर त्यांची प्रगती कशी होईल? 
मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाइतकाच मानसिक विकास सुद्धा महत्वाचा आहे,म्हणूनच मुलांच्या  संगोपनात अभ्यासाइतकेच प्राधान्य खेळण्याला सुद्धा दिले पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.