मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज

१९फेब्रुवारी सोळाशे ३० हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय.

"प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल"!


शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले.शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले.रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून  स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी  सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू.त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर कोंडाजी फर्जद अशा अनेक शूर वीरांनी साथ दिली होती.शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणश्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले.आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणीले.

६ जून १६७४रोजी  राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि सुमारेसाडे तीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या,जुलमी शासन कर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने मिळाला.

शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता.   शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत. अफजलखान भेटीच्या वेळी त्यांच्या सैन्यात सिद्धी इब्राहीम हा त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक होता. महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.

शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्‍यांना पगार सुरु केले.शेतकर्‍यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.

शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. .ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती .जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज  !

एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत.  आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.

शिवराय हे  पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधूसंतांचा आदर होता. आणि प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता.अशाप्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते.

“प्रधान अमात्य सचीव मंत्री,

सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री,

सेनापती त्यात असे सुजाणा,
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।

अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्यला पक्वान्‍नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्यला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते, राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.

 

शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.