संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
"डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम".
वाचन प्रेरणा दिन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर या दिवशी असतो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे आहे.
त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते, त्यांचा जन्म 15ऑक्टोबर 1931
तमिळनाडू, भारत
यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती.
आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते
"लोकांचे राष्ट्रपती"!! म्हणून लोकप्रिय झाले.
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत I.S.R.O क्षेपणास्त्र koविकासातील एसएलव्ही सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओ D.R.D.O )मध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हा पासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल - ३या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्रा चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील _अग्नी_ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुनहा एम.बी.टी.( Man Battle Tank) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट ( एलसीए ) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.1960 मध्ये मद्रास येथून पदवी घेतल्यानंतर कलाम हे संरक्षण संशोधन आणि विकास सेवा चे सदस्य बनले आणि त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, भारत सरकारद्वारे) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले. त्यांनी एक लहान हॉवरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु डीआरडीओमध्ये नोकरीच्या निवडीबद्दल त्यांना खात्री पटली नाही. कलाम हे प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या INCOSPAR समितीचा देखील भाग होते.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला...
मेघालयची राजधानी शिलाँग येथे 27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉ. माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांचे अंतिम संस्कार गुरुवारी 30 जुलै 2015 रोजी सकाळी 11 वाजता तामिळनाडूतील रामेश्वरम शहरात पूर्ण सैन्य सन्मानासह करण्यात आले.त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात, त्यांना प्रेमाने "जनतेचे राष्ट्रपती" (People's President) म्हणून ओळखले जात असे. असे म्हणतात की ऑफिस ऑफ द प्रॉफिट स्वाक्षरी करणे हा त्यांच्या कार्यकाळात घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता.राष्ट्रपतीपदानंतर कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर येथे व्हिजिटिंग प्रोफेसर बनले; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे मानद फेलो; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरमचे कुलपती; अण्णा विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक; आणि भारतभरातील इतर अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये सहायक. त्यांनी हैदराबादच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि बनारस हिंदू विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठात तंत्रज्ञान शिकवले.
डॉ अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ होते तसेच एक गंभीर विचारवंत आणि एक चांगले मानव होते.
डॉ. कलाम यांच्या मते,
एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनीआपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणिसमाजाचा उद्धार करावा..

great man Doctor
उत्तर द्याहटवा