संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण ?
----------------------------------------------
आई?
वडील?
पत्नी?
मुलगा?
नवरा?
मुलगी?
मित्र?
ह्यापैकी कुणीही नाही.
तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर.
शरीर संपत्ती."Health is wealth"
एकदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं.
तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.
तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.
तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते.
हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.
तुमचे शरीर ही तुमची संपदाजबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात.
स्वस्थ रहा. स्वतःची नीट काळजी घ्या. पैसा काय? येत राहील, जात राहील. नातेवाईक आणि मित्रमंडळी स्थायी नसतात.
तुमच्या स्वतः शिवाय तुमच्या शरीरासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही.
प्राणायाम - फुफ्फुसांकरिता @pranayam
दैनंदिन प्राणायाम प्राणायामामुळे आत्मिक आनंद प्राप्त होतो. मनःशांती आणि समाधान मिळते .प्राणायाम केल्याने मनुष्य दीर्घायुषी होतो. स्मरणशक्ती वाढते. शरीर सुदृढ आणि निरोगी रहाते. आपल्या शरीरातील जवळपास सर्व नाडी ची शुद्धी होते. मनोविकृती नाहीशी होते. रोज नियमित प्राणायाम केल्यामुळे लहान व मोठे आतडे योग्य कार्य करू लागते. शरीराची पचनसंस्था सुधारते.मुत्राशय, यकृत, पोट कार्यक्षम बनतात.चिरंतन प्राणायाम करणारा योगसाधक निग्रही बनतो. त्याचे ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात. सदैव उत्साही आणि आनंदी रहातो. मनाची एकाग्रता वाढते. मनाचा आतला आवाज जो आपल्याला चांगले वाईट काय आहे? याचे मार्गदर्शन करीत असतो तो ऐकू येऊ लागतो. नियमित प्राणायामामुळे आळस जातो. शरीराची सुस्ती कमी होते.
असा हा प्राणायाम शरीराबरोबर मनाचीही शुद्धता करतो म्हणूनच तो प्रत्येकाने रोज केला पाहिजे.
श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो.#yoga
ध्यान - मनाकरिता #Meditation
विपश्यना ध्यानपद्धती आत्मसात केल्यानंतर साधक स्वतःकडे तटस्थ भावनेने पहायला शिकतो असे अपेक्षित आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा घटक असलेल्या उणीवा जणीवपूर्वक भरून काढणे आणि बलस्थाने अधिक सक्षम करणे हे यात अपेक्षित आहे. आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे तटस्थपणे पहायला शिकणे आणि शांततेच्या मार्गाने त्यावर मात करीत आयुष्याचा आनंद घेणे असे ही ध्यानपद्धती शिकविते. वास्तवाकडे सर्व आयामांनी पहायला शिकणे यासाठी ही ध्यानपद्धती पोषक ठरते. कोणतीही गोष्ट काही काळाने बदलते मात्र त्यासाठी आवश्यक संयम मिळविण्याचा मार्ग या प्रक्रियेतून आत्मसात करता येतो.
@Meditation
योग - शरीराकरिता@YOGA
योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे, योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होऊ शकतात. व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे.योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनि आविष्कृत केले होते
@Yoga
चालणे - हृदयाकरिता @Walking
दररोज ३० मिनीटे चालण्याचे हे आहेत ३० फायदे@30
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या उन्हातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात
२४. मोतीबिंदुची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.
@Walking
सकस अन्न - आतड्यांकरिता# Good Food
मानवाच्या शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. पौष्टीक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरीही त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो. म्हणून निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची आवश्यकता आहे.
व्यक्तीचे वय, लिंग, उंची, शारीरीक क्षमता आणि वजनानुसार संतुलित आहाराची आवश्यकता असते. या आहारात कॅलरीज, प्रोटीन, लोह व जीवनसत्वे विशिष्ट प्रमाणात असतात. संतुलित आहार घेतल्यावर त्यामध्ये पौष्टीक घटकाचा समावेश आहे की नाही हे समजावून घेतले पाहिजे. कारण अन्नात पौष्टीक घटकांसोबत पोषणमुल्य नसलेल्या घटकांचा समावेश असू शकतो, जो शरीराला हानीकारक असतो. त्यामुळे या अपौष्टीक घटकांचीही माहिती असणे आवश्यक आहे.
पोषक नसलेले मुख्य घटक खालील प्रमाणे आहेत. ट्रिप्सीन इनहीबिटर हा पदार्थ सोयाबीन, राजमा, बालोर आणि अंड्याचा पांढरा भाग यामध्ये असतो. या खाद्यपदार्थात असलेले प्रोटीन अमिनो एसिड ट्रिप्सीन पचनशक्ती आणि कार्यक्षमता कमी करतात. परंतु, अधिक तापमानात उकळल्यास हा घटक नष्ट होतो आणि खाद्यपदार्थात असलेले टिप्सिन अमीनो एसिड जे पचनशक्ती आणि कार्यक्षमता वाढवते ते सहजपणे रक्तात मिसळले जाते.
फाइटेट नावाचा घटक ज्वारी, बाजरीत मोठ्या प्रमाणात असतो. या अन्नातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि लोह यासारख्या पौष्टीक घटकांना अधिक घट्ट बनविले जाते. ज्यामुळे वरील घटकांचे शरीरात शोषण योग्य पद्धतीने होत नाही. यासाठी अंकुरित अन्नधान्याचा उपयोग करून खाद्यपदार्थातील फाइटेट कमी केले जाऊ शकते. म्हणूनच लहान मुलांसाठी अंकुरित केलेल्या धान्याच्या पिठाचा उपयोग करण्यास सांगितले जाते.
टॅनिन हे बहुतेक हिरव्या भाज्या, मसाले आणि बाजरीत सापडते. टॅनिनचा संयोग लोहाशी झाल्यामुळे लोहाचे शरीरात पचन होत नाही. वरील खाद्यपदार्थांबरोबर लिंबू, चिंच किंवा दह्याचा उपयोग केल्यास टेनिनचे प्रमाण कमी होते. याच कारणामुळे आहारात पालक, मेथी व अन्य हिरव्या भाज्यांचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यामुळे शरीराला लोह मिळू शकत नाही. परंतु, हिरव्या भाज्यांबरोबर कोणताही आंबट खाद्यपदार्थ जसे टोमॅटो, लिंबूसेवन केल्यास शरीरात सहजपणे लोह शोषले जाते. आणि रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.
फायबर- पदार्थांध्ये पचन न होणार्या कार्बोहायड्रेड्सला फायबर असे म्हटले जाते. कॉम्प्लेक्स फायबरचे एंजाइम्सद्वारे पचन होत नाही आणि मलपृष्ठाद्वारे बाहेर पडतात. कॉम्पेलेक्स फायबर मधुमेह, ह्दयरोग, लठ्ठपणा, रक्तदाब आणि कर्करोगासारख्या आजाराला कमी करण्यास मदत करतो.
संतुलित आहार घेतला तर आपण नक्कीच मानसिक व शारीरीकदृष्ट्या स्वस्थ राहू शकाल.
चांगले विचार - आत्म्याकरिता@Good thought
जोपर्यंत आपल्यावर उत्सुकता आणि विश्वास आहे आणि आपण काम करण्यास तयार आहात तोपर्यंत आपण जगात कोणतीही कामे करू शकता हे ह्या महान व्यक्तींच्या विचारातून आपल्याला प्रेरणा काहीही मिळवू शकता. मित्रांनो, जीवनात कुठलेही लक्ष्य प्राप्त करतांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि धैर्य. जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि कधीही संयम गमावला नाही तर आपण आपल्या मेहनतीने पाऊल टाकत असाल तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु बर्याचदा असे घडते की जेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही तेव्हा आपण निराश होण्याचा प्रयत्न सोडून देतो. पण मित्रांनो, आपण कधीही निराश होऊ नये, परंतु अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
@बालस्नेही
#महारष्ट्र शिक्षक पॅनल.

Nice
उत्तर द्याहटवा