मुख्य सामग्रीवर वगळा

Buddhism in Odisha



ओरिसा - बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा 

Buddhism in Odisha


भारतामधील ओरिसा राज्याचे मूळ नाव ओद्र-देसा असून ते बौद्ध संस्कृतीतून उदयास आले आहे. इथल्या प्रत्येक जिल्ह्यात डोकावून बघितल्यास अक्षरशः हजारो पुरातन बौद्ध स्थळे दिसून येतील. यांची नावे आज जरी बदलली असली तरी मूळ संस्कृती अवशेष काही नष्ट झाले नाहीत. आंध्रप्रदेशाची किनारपट्टी ते पश्चिम बंगाल किनारपट्टी पर्यंतचा भाग पुरातन बौद्ध स्थळांनी भरलेला आहे. बंगालच्या उपसागराला लागून असलेले ओरिसा राज्य हे आंध्रप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल यांच्या सीमांनी पूर्ण वेढले आहे. एकेकाळच्या या उत्कल प्रांतात सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर सर्व कायापालट केला. धम्मप्रसारासाठी १९ तुकड्या स्थापित केल्या. त्यामुळे त्यांच्या काळातच बौद्ध संस्कृतीची भरभराट येथे झाली. थेरवाद, महासंघीका आणि सर्वस्तीवाद या शाखा तेथे लोकप्रिय झाल्या. म्हणूनच या राज्याच्या केंद्रभागी 'बौद्ध' नावाचा जिल्हा असून इतरही नावे बघितल्यास बौद्ध संस्कृतीची खाणच इथे असल्याचे दिसते. गजापती, गंजम, पुरी, भद्रक, देवगढ, बारगढ, अंगुल, जाजपुर, बालनगीर, बालेश्वर अशा अनेक जिल्ह्यात बुद्धिझम बहरला होता. पुढेपुढे अनेक बौद्ध आचार्य, भिक्खू यांनी उत्कल प्रांतात येऊन महायान पंथास लोकप्रिय केले. 

या राज्यातील 'बौद्ध' जिल्ह्यासंबधी शोध निबंध नुकताच वाचनात आला, तेंव्हा या भारतभूमीत बुद्ध किती खोलवर रुजला आहे याची जाणीव झाली. जाजपुर जिल्ह्यातील पुष्पगिरी महाविहार, सम्राट अशोक स्तूप, भुवनेश्वर पासून ९० कि.मी. अंतरावर असलेली सम्राट अशोक स्तुपांची लांगुडी टेकडी, गजपती जिल्ह्यातील पद्मसंभव मॉनेस्ट्री, जौगाडा व धौली येथील सम्राट अशोक शिलालेख, कोणार्क जवळील कुरुमा बौद्ध विहार अवशेष, धौलीचा शांतिस्तुप, ललितगिरी- उदयगिरी- रत्नागिरी येथील स्तूप आणि विहारे, कोणार्क विहार, बुद्धनाथ विहार, दंबारुगडा अशी बौद्ध संस्कृतीची असंख्य स्थळे असून त्या सर्वांची नावे इथे नमूद करणे शक्य नाही. अभ्यासकांनी तेथील देवळांचा अभ्यास केल्यास खरी संस्कृती कोणती ते माहीत होईल. इथेच बुद्धांच्या दंत अस्थी होत्या, ज्या आता सिरिलंकेत कँडी येथे आहेत. जगन्नाथ मंदिर हे मूळचे दंत अस्थींचे विहार होते. आचार्य दिघनागा भिक्खू हे चौथ्या शतकात पुरीच्या विहाराचे प्रमुख होते. बुद्धांचे दुसरे नाव भुवनेश्वर होते,असे देखील आता उघडकीस आले आहे. हुएंनत्संग या चिनी भिक्खुंनी ओद्र-देशाबद्दल लिहिले आहे की येथे शेकडो संघाराम (मॉनेस्ट्री) असून दहा हजार भिक्खुंचे वास्तव्य तेथे आहे. बंगाल उपसागराचा मोठा किनारा ओरिसास लाभला असल्यामुळे येथूनच एकेकाळी जावा, सुमात्रा, सिलोन, म्यानमार, थायी देशात व्यापाराबरोबर धम्म प्रसार झाला. 

असा हा ओरिसा प्रांत तेराव्या शतकापर्यंत बौद्ध संस्कृतीने दुमदुमला होता. नंतर सत्यधर्म लयास गेल्यावर अनेक संघाराम यांचे देवळात रूपांतर होत गेले. तरीही ओरिसाच्या काही पॉकेट्समध्ये मूळ बौद्ध अजूनही तग धरून आहेत. कटक जिल्ह्यातील मानियाबंध येथे सुद्धा मूळ बौद्ध जमात असून ते विणकराचा व्यवसाय करतात. त्यांची रेशमी वस्त्रांची 'इकत' प्रावरणें ही जगप्रसिद्ध आहेत. मराठेशाही सुद्धा इ.स. १७५१ ते १८०३ पर्यंत इथे राज्य करीत होती. त्यामुळे येथील बोली भाषेत मराठी शब्द आढळतात हे ऐकून आश्चर्य वाटते. तरी पुरातन बौद्ध संस्कृतीचा उत्कल प्रांताचा हा वारसा म्हणजेच आताचे राज्य ओरिसा, हे जरूर ध्यानात ठेवावे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.