मुख्य सामग्रीवर वगळा

जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिवस

सकाळची शांत वेळ, उगवत्या सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत डोकावतात आणि समोर कपाटात ठेवलेली, धुळीनं झाकलेली पुस्तकं शांतपणे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या पानांमध्ये  अखंड जीवनाच्या असंख्य गोष्टी बंदिस्त असतात. आज जागतिक पुस्तक दिन! आणि हाच तो दिवस, ज्या दिवशी जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्म झाला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच, हा दिवस  पुस्तकांच्या रूपाने  गौरव करण्यासाठी आहे.
कोणतेही पुस्तक एका दिवसात जन्म घेत नाही. लेखकाच्या मनात कल्पनेची एक ठिणगी पडते. तो त्याच्या मनातल्या भावना, विचार, अनुभव यांना शब्दांत पकडू लागतो. लिहिताना तो रडतो, हसतो, जगतो. त्याच्या डोळ्यांत झोप नसते, हातात थरथर असते. प्रत्येक वाक्य म्हणजे त्याच्या आत्म्याचा एक अंश. हे पुस्तक तुमच्या हातात पोहोचेपर्यंत अनेक टप्पे पार करते,कागद, संपादन, मुद्रण, वितरण. ते केवळ शब्द नाहीत, तर लेखकाच्या हृदयाचा ठाव असतात.
कधी तुम्ही कपाट उघडलंय का?          तिथे  रांगेत लावलेली पुस्तकं तुमच्याकडे बघत म्हणत असतात,
“माझा एकदा हात धर… माझं एकदा मनापासून ऐक… मी तुला काहीतरी वेगळं शिकवेल.”
पण आपण ती पुस्तकं कपाटातच ठेवतो,धूळ खात, पानं कुरतडण्यासाठी.
पुस्तकं जळायला हवीत, हो पण अज्ञानाच्या अंध:काराला पेटवण्यासाठी!
पुस्तकं वाचण्यासाठी असतात, शोभेसाठी नव्हे.
शेक्सपियर म्हणजे केवळ एक नाटककार नव्हे, तर एक तत्वज्ञ.
“To be or not to be?” हा प्रश्न फक्त हॅम्लेटचा नव्हता, तो आजच्या तरुणांचाही आहे,माझा, तुमचाही.
त्याच्या लेखणीतून प्रेम, संघर्ष, राजकारण, मानवी मनाची गुंतागुंत हे सर्व पिढ्यानपिढ्या पोहोचलं.
“All the world’s a stage, and all the men and women merely players...”
हा विचार किती खोल आहे!
जग आजही शेक्सपियर वाचतं, कारण त्याने माणसाला त्याच्या आरशात पाहण्याची भाषा दिली.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी पुस्तक असतं, जे वाचताना डोळे ओलावते, आणि पुन्हा जगण्याचं बळ देतं.
ते पुस्तक कोणतं? ते शोधा. वाचा. लिहा.
माझ्यासाठी ते आहे – "Annihilation of Caste" – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पुरोगामी, अंतर्मुख करणारं आणि अंतर्बंधन तोडणारं पुस्तक.
तुमच्यासाठी ते कोणतं? "माझे सत्याचे प्रयोग" ‘चंद्रकांता’? ‘फकिरा’? ‘अग्निपंख’? पानिपत, ‘गुलामगिरी’? ‘युगंधर’? ‘स्वामी’? ‘सिद्धार्थ’? ‘द काइट रनर’? कोसला, पांगिरा,,छावा"‘झुंड’? "जीत आपकी"
कोणतंही असो, ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. वाचनाचा तो एक क्षण तुमचं भविष्य घडवतो.
एका झोपडीतून उठून संपूर्ण राष्ट्र घडवणारा माणूस म्हणतो,
“ग्रंथ माझे गुरू!”
मग आपण का केवळ परीक्षेसाठी, नोकरीसाठी पुस्तक उघडतो?
वाचन ही सजा नाही, ती संधी आहे.
वाचन म्हणजे आत्मा जागवणं आहे, आपल्या अस्तित्वाला अर्थ देणं आहे.
वाचनालयातून पुस्तक घेणं चांगलं, पण पुस्तक विकत घेऊन आपल्याजवळ ठेवणं… त्याला आपलं करणं!
पुस्तक घ्या, वाचा, मित्राला द्या, पुन्हा वाचा.
 आपण महिन्याला एक अमूल्य पुस्तक विकत घेऊ शकतो.आपणास एक विनंती,तुमच्या कपाटात धूळ खात पडलेल्या पुस्तकांना बाहेर काढा. त्यांना वाचा. त्यांना स्पर्श करा.
कारण त्यांनी तुमच्यासाठी नवा दृष्टीकोन तयार केला होता.
ते तुमचं एकटेपण भरून काढत होते.
आज त्यांना विसरू नका.जेव्हा आपण पुस्तक वाचतो, तेव्हा आपण स्वतःच्या आत डोकावतो.
एखाद्या पात्राचं दुःख वाचताना आपण हळवे होतो, त्याचा संघर्ष आपल्या मनात रुंजी घालतो.
हेच तर पुस्तकाचं सामर्थ्य आहे ,ते आपल्याला माणूस बनवतं.एका तरी पुस्तकाला स्पर्श करा. एक ओळ वाचा. एक विचार लक्षात ठेवा.कारण पुस्तकं ही केवळ वाचनासाठी नसतात, ती जिवंतपणासाठी असतात.
आजच्या या जागतिक पुस्तक दिनी, आपल्या जीवनाचा खरा मित्र पुन्हा शोधा,पुस्तक!
कारण पुस्तकाच्या पानांमधूनच घडतो इतिहास, समाज आणि माणूस!!   🙏🏻🙏🏻           *मनोज चौरपगार* 9403618991

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.