साक्षरता दिवस:-
दरवर्षी जागतिक साक्षरता दिनाची विशेष थीम असते. गेल्या वर्षी, साक्षरता दिवस 2022 ची थीम 'साक्षरता शिकण्याच्या जागा बदलणे' होती. या वर्षी,
साक्षरता दिवस 2023 ची थीम 'संक्रमणात असलेल्या जगासाठी साक्षरतेला प्रोत्साहन देणे: शाश्वत आणि शांततापूर्ण समाजांसाठी पाया तयार करणे' आहे.जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
देशाच्या विकासासाठी अधिकाधिक नागरिकांनी साक्षर होणे आवश्यक आहे. साक्षरता प्रगती आणि विकासाचा घटक बनली आहे. ज्या व्यक्तिला लिहिता-वाचता येते ती साक्षर असते. ज्याला 'अ,ब,क' चे ज्ञान आहे, भाषेचे मोठेपणा आहे तसेच योग्य आणि अयोग्य मधील फरक समजतो तो साक्षर आहे.
साक्षरतेच्या विकासाबरोबरच समाजात आदरही निर्माण होतो. लोकांना साक्षरतेचे महत्त्व आणि फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय पातळीवर पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८४.७ टक्के, तर महिलांमध्ये ७०.३ टक्के आहे. विकसित राज्यांमध्ये महिला-पुरुषांच्या साक्षरतेच्या टक्केवारीतील ही तफावत अत्यल्प आहे. केरळमध्ये पुरुषांमध्ये ९७.४, तर महिलांमध्ये ९५.२ टक्के साक्षरता आहे. दिल्लीत हे प्रमाण अनुक्रमे ९३.७ आणि ८२.४ आहे.
एकूण राज्यांच्या यादीत महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात १२.३ टक्क्यांची तफावत आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला या ७८.४ टक्के साक्षर आहेत. साक्षरतेबाबत देशात पहिली पाच राज्ये १. केरळ २. दिल्ली ३. उत्तराखंड ४. हिमाचल प्रदेश ५. आसामसाक्षरतेत सर्वात मागे असलेली राज्ये १. आंध्र प्रदेश २. राजस्थान ३. बिहार ४. तेलंगण ५. उत्तर प्रदेशतेलंगणा राज्यात साक्षरतेचे प्रमाण हे 72. 8 टक्के आहे. तर आंध्र प्रदेशात हे प्रमाण ६६.४ टक्के आहे. कर्नाटकात साक्षरतेचे प्रमाण ७७.२ आहे. आसामचा विचार करायचा झाल्यास आसाममध्ये साक्षरतेचे प्रमाण हे ८५.९ टक्के आहे. उत्तराखंड ८७.६ टक्क्यांसह देशात तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली हे राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे.
शिक्षण धोरणात सरकारचा प्रभाव कमीत कमी असावा - पंतप्रधाननॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भात रिपोर्ट जाहीर केला असून या रिपोर्टमधील माहीतीनुसार केरळने आपले प्रथम स्थान अबाधित राखले आहे. इतकेच नव्हे तर केरळमधील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही चांगले आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेमध्ये अवघे 2.2 टक्के अंतर आहे. संपुर्ण देशाचा विचार करायचा झाल्यास भारतात पुरुषांमधील साक्षरता ही महिलांपेक्षा अधिक आहे. पुरुष ८४.७ टक्के तर ७०.३ टक्के महिला साक्षर आहेत. यामध्ये १४.४ टक्के इतके अंतर आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -