मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी व्याकरण @समास प्रकार

समास प्रकार :  
दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांचा किंवा अव्ययांचा लोप होऊन जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.जोडशब्द बनविण्याची अथवा एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तिला समास म्हणतात. , 

(१) अव्ययीभाव – यात अव्यय हे प्रधान असून सामान्यतः पूर्वनिपाताने ते समासात पहिल्या स्थानी येते. म्हणून हा समास पूर्वपदप्रधान असतो. संपूर्ण सामासिकशब्द हा व्याकरणदृष्ट्या अव्यय म्हणूनच राहत असल्याने त्याला अव्ययीभाव अशी संज्ञा आहे. हा समास एकवचनी व नपुंसकलिंगी असतो. 
उदा.,दररोज,यथाक्रम.


(२) तत्पुरुष– हा समास उत्तरपदप्रधान असतो.या समासात दुसरे पद महत्वाचे असते. या समासाचे कर्मधारय, द्विगु, उपपदतत्पुरुष एवढेच उपप्रकार पाणिनीने सांगितले आहेत. परंतु विग्रहाच्या प्रकारानुसार अलिकडच्या काळात विभक्ति तत्पुरुष, प्रादितत्पुरुष, नञ्-तत्पुरुष हे सुद्धा उपप्रकार मानण्यात येतात. समासातील शेवटच्या शब्दानुसार संपूर्ण सामासिक शब्दाचे व्याकरणदृष्ट्या स्थान म्हणजे नाम किंवा विशेषण व लिंग ठरते.

कर्मधारय– सामान्याधिकरण्यात म्हणजे दोन समान विभक्तींत (प्रथमा विभक्तीत) हा समास सोडवला जातो. त्यामुळे त्यांच्यातील विशेषण-विशेष्य, विशेषनाम, उपमान-उपमेय असे संबंध हा समास दाखवतो. समासात विशेषणाला व विशेषनामाला पूर्वनिपात होतो. उदा. नीलं कमलम् – नीलकमलम् । महत् नगरम् – महानगरम् । पुणे नाम नगरम् – पुणेनगरम् । तर उपमेय-उपमान संबंधात दोन्हीपैकी कोणालाही पूर्वनिपात होऊ शकतो. 

द्विगु– संख्यावाचक पदांशी समास झाल्यास तो द्विगु तत्पुरुष समास मानला जातो व संख्यावाचक शब्दाला पूर्वनिपात होतो. हा समास नेहमी एकवचनी असतो.
उपपदतत्पुरुष – पाणिनीच्या सूत्रांनुसार उपपदसंज्ञक पदांचा समर्थ शब्दांशी तत्पुरुष समास होतो. हे नित्यसमास असतात. म्हणजे त्यांचे स्वपद-विग्रह होत नाहीत.या समासातील दुसरे पद कृदंत किंवा धातुसाधित असते,त्याचा स्वतंत्रपणे वाक्यात उपयोग होऊ शकत नाही. उदा. कुम्भं करोति – कम्भकारः । येथे ‘कुम्भं करोति’ हा विग्रह नसून अर्थबोध करून देणारे वाक्य आहे. याचप्रमाणे, शास्त्रं जानाति – शास्त्रज्ञः, पङ्कात् जायते – पङ्कजम् । हे सुद्धा उपपदतत्पुरुष समास आहेत.ग्रंथकार,पांथस्थ,गृहस्थ हीसुद्धा काही उदाहरणे आहेत.

विभक्ति तत्पुरुष – त्या त्या कारकांच्या संबंधानुसार द्वितीया ते सप्तमी या विभक्तिंतील शब्दांबरोबर होणाऱ्या समासांना विभक्तितत्पुरुष असे म्हटले जाते. समास होत असताना जो विभक्ती लोप पावतो किंवा विग्रह करताना ज्या विभक्तीचा उपयोग करावा लागतो त्या विभक्तीचे नाव त्या विभक्ती तत्पुरुष समसास देण्यात येते.उदा. कष्टं श्रितः – कष्टश्रितः । भूमिं गतः – भूमिगतः । दैवेन रक्षितः – दैवरक्षितः । कुण्डलाय हिरण्यम् – कुण्डलहिरण्यम् । काकाय बलिः – काकबलिः । सर्पात् भयम् – सर्पभयम् । ऋणात् मुक्तः – ऋणमुक्तः । राज्ञः पुरुषः – राजपुरुषः । कलायां निपुणः – कलानिपुणः ।

नञ्-तत्पुरुष – नकारार्थी अव्यय पूर्वपदी असून त्याचा समर्थ पदाशी समास झाल्यास तो नञ्-तत्पुरुष समास होतो. उदा. न भयम् – अभयम् । न आदरः – अनादरः । नञ्-तत्पुरुष समास ही विशेष संज्ञा अलिकडच्या काळात प्रचलित झाली आहे.

(३) द्वंद्वसमास –यात दोन्ही वा जास्त शब्द तुल्यदर्जाचे असतात व ते ‘चकारा’ने म्हणजेच ‘आणि’ या अर्थाने जोडले जातात. थोडक्यात त्यांच्यात एकमेकांशी कारकाचा संबंध नसतो. इतरेतर व समाहार असे द्वंद्वसमासाचे उपप्रकार आहेत.

इतरेतर– यात समासाचे लिंग हे समासातील शेवटच्या शब्दाच्या लिंगानुसार होते. वचन हे समासात असणाऱ्या शब्दांच्या संख्येनुसार एकवचन किंवा बहुवचन असते.  रामः च कृष्णः च – रामकृष्णौ । ग्रामाः च वनानि च – ग्रामवनानि । दम्पती(प्रथमा द्विवचन) – जाया च पतिः च । येथे जाया या शब्दाला दम् असा आदेश होऊन ‘दम्पती’ असा समास बनतो.

समाहार– समाहार याचा अर्थ समूह. या समासाच्या विग्रहात दोन्ही पदांच्या आणखी इतरही पदांचा समावेश होतो.त्यामुळे हा समास नेहमीच नपुंसकलिंगी व एकवचनी असतो.उदा.पाऊसपाणी,पैसाअडका तसेच  पाणी च पादौ च  एतेषां समाहारः – पाणिपादम् ।

एकशेष – एकशेष हा पाच वृत्तींपैकी एक प्रकार असून त्याचा विग्रह द्वंद्व समासाप्रमाणेच होतो. मात्र द्वंद्वाप्रमाणे विग्रहातील सर्व शब्द सामासिक शब्दात येत नाहीत, तर त्यांतील एकच शब्द समासात शिल्लक रहातो. त्यामुळेच पाणिनीय व्याकरणानुसार तो समास नसून त्याला समासाची कार्ये लागू होत नाहीत.अलिकडच्या काळात मात्र त्याला एकशेषसमास असे संबोधले जाऊ लागले. उदा. माता च पिता च – पितरौ ।

(४) बहुव्रीही– समासातील पदांखेरीज अन्यपदार्थाला प्राधान्य असते, तेव्हा हा समास होतो. त्यामुळे संपूर्ण सामासिकशब्द हा विशेषणात्मक असतो. याचे दोन प्रकार आहेत. १. समासातील दोन्ही शब्द विग्रहात एकाच विभक्तीत असल्यास तो समानाधिकरण बहुव्रीही होतो. 
उदा. विद्या एव धनं यस्य सः – विद्याधनः (गुरुः) । पीतम् अम्बरं यस्य सः – पीताम्बरः (विष्णुः) । २. समासातील दोन्ही शब्द विग्रहात वेगवेगळ्या विभक्तींत असल्यास तो व्यधिकरण बहुव्रीही होतो. 
उदा. चक्रं पाणौ यस्य सः – चक्रपाणिः

(५)अलुक् समास – हा स्वतंत्र प्रकार नसून वरील समासांचाच उपप्रकार म्हणता येईल. समास तयार करताना सामान्यपणे विग्रहातील पदांच्या विभक्ति-प्रत्ययांचा लोप होतो. पण कधीकधी विभक्ति-प्रत्ययांचा लोप न होता ते प्रत्यय सामासिक शब्दांतही तसेच राहतात. तेव्हा त्याला अलुक् समास म्हणतात. असे अलुक् समास तत्पुरुष व बहुव्रीही समासान्तर्गत आढळतात. उदा. युधि स्थिरः – युधिष्ठिरः  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.