मुख्य सामग्रीवर वगळा

मुंशी प्रेमचंद

मुंशी प्रेमचंद हित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी १९१३ते१९३३पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क'मध्ये ८ ऑक्टोबर १९०३पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली.

प्रेमचंद यांनी महात्मा गांधी विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थानवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त झाली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.

इ.स. १९२१पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. इ.स. १९२३मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस'ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपट लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले. प्रेमचंद हे लेखणीचा शिपाई म्हणून ओळखले जातात.

प्रेमचंद्र आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून ओळखले जातात. १९०१ पासून त्यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभ सुरू झाला. पण त्यांची पहिली हिंदी कथा सरस्वती पत्रिकेत डिसेंबरच्या अंकात १९१५ मध्ये 'सौत' या नावाने प्रकाशित झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह 'सोजे वतन'. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असल्याने त्यांच्या पुस्तकांवर इंग्रज सरकारने बंदी घातली व अशा प्रकारचे लेखन करू नये म्हणून बजावण्यात आले.

मरणोपरान्त त्यांची कथा मानसरोवर नावाने ८ खंडांमध्ये प्रकाशित झाली. त्यांची शेवटची कथा 'कफन' १९३६मध्ये प्रकाशित झाली. याच्या आधी हिंदीमध्ये काल्पनिक,अय्यारी आणि पौराणिक धार्मिक रचनाच प्रकाशित केली जात होती. प्रेमचंद यांनी हिंदीमध्ये यथार्थवादाची सुरुवात केली. भारतीय साहित्याचा बराचसा विमर्श नंतर समोर आला. दलित साहित्य आणि नारी साहित्याची खोलवर मुळे प्रेमचंदांच्या साहित्यात दिसली. प्रेमचंदांचा लेख 'पहली रचना' आपल्या मामांवर लिहिलेला व्‍यंगलेख होता, मात्र हा आता अनुपलब्‍ध आहे. त्यांचा पहिली उपलब्‍ध कादंबरी उर्दू उपन्यास 'असरारे हमसवाब' होय. याचे हिंदीत रूपांतर प्रेमा नावाने १९०७ साली प्रकाशित झाले .प्रेमचंदांची दुसरी कादंबरी 'हमखुर्मा व हमसवाब' पण प्रकाशित झाली. यानंतर प्रेमचंदांचा पहिला कथासंग्रह सोज़े-वतन नावाने आला. तो १९०८मध्ये प्रकाशित झाला. देशभक्तीच्या भावनांनी ओतप्रोत असल्याने यावर इंग्रज़ी शासनाने बंदी घातली, आणि भविष्‍यात अशा प्रकारचे लेखन न करण्याचे निर्देश दिले. या कारणांनी त्यांना नाव बदलून लेखन करावे लागले. 'प्रेमचंद' या नावाने त्यांची पहिली कथा 'बड़े घर की बेटी 'ज़माना पत्रिका'मध्ये डिसेंबर १९१० च्या अंकात प्रकाशित झाली. कथा सम्राट प्रेमचंदांचे म्हणणे होते की साहित्यकार देशभक्ति आणि राजनीतीच्या मागे जाणारी सच्चाई नाही तर त्याच्या पुढे मशाल दाखवत चालणारी सच्चाई आहे. हे सत्य त्यांच्या साहित्यातून दिसून येते. १९२१मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या आवाहनानुसार आपली नोकरी सोडून दिली आणि काही महिने 'मर्यादा पत्रिकाचा संपादनभार सांभाळला. सहा वर्षापर्यंत 'माधुरी' या पत्रिकेचे संपादन केले. १९३०मध्ये बनारस येथून आपले मासिक पत्र 'हंस' सुरू केले आणि १९३२ च्या सुमारास जागरण नावाने एक साप्ताहिक अजून काढले. त्यांनी लखनौमध्ये १९३६ साली झालेल्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मोहन दयाराम भवनानींच्या अजंता सिनेटोन कंपनीमध्ये कथालेखक म्हणून नोकरीपण केली. १९३४मध्ये प्रदर्शित मजदूर या फिल्मची कथा लिहिली आणि कॉन्ट्रॅक्ट केलेल्या वर्षभराचा कालावधी पूर्ण करण्याआधीच दोन महिन्‍याचा पगार सोडून ते बनारस येथे पळून गेले. त्यांनी मूळरूपाने हिंदीमध्ये १९१५ पासून कथा लिहिल्या आणि १९१८ च्या 'सेवासदन'पासून कादंबऱ्या लिहायला सुरुवात केलीप्रेमचंदांच्या अनेक कथांमध्ये निम्न व मध्यम वर्गांचे चित्रण आहे. डॉ॰ कमलकिशोर गोयंकाने प्रेमचंदांच्या सर्व हिंदी-उर्दू कथांना 'प्रेमचंद कथा रचनावली' नावाने प्रकाशित केले आहे. त्यांच्यानुसार प्रेमचंदांनी एकूण ३०१ कथा लिहिल्या, पैकी ३ अप्राप्य आहेत. प्रेमचंदांचा पहिला कथासंग्रह सोज़े वतन'नावाने जून १९०८मध्ये प्रकाशित झाला. याच संग्रहातली पहिली कथा 'जगातील सर्वात अनमोल रत्न'ला त्यांची पहिली प्रकाशित कथा मानले गेले.

प्रेमचंदांना "मुन्शी प्रेमचंद" या नावाने ओळखले जाते. प्रेमचंदांच्या नावाला 'मुंन्शी' कधी आणि केव्हा चिकटले ? या विषयावर बहुतेक लोक हेच मानतीत की सुरुवातीला प्रेमचंद अध्यापक होते अध्यापकांना त्या वेळी मुन्शी म्हटले जाई. शिवाय कायस्थांच्या नावापुढे सन्मानस्वरूपी 'मुन्शी' शब्द लावण्याची परंपरा होती म्हणून प्रेमचंदांच्या नावाआधी मुन्शी शब्द रूढ झाला.. प्रोफेसर शुकदेव सिंहांच्या मते प्रेमचंदांनी आपल्या नावाआधी 'मुन्शी' शब्दाचा प्रयोग स्वतः कधी केला नाही. प्रेमचंदांच्या प्रशंसकांनी 'मुन्शी' कधी लावले हे केवळ तर्काने जाणून घेता येते .प्रेमचंदांच्या नावाआधी मुन्शी हे विशेषण जोडण्याचे प्रामाणिक कारण हे आहे की 'हंस' नामक पत्रिका प्रेमचंद आणि 'कन्हैयालाल मुन्शी' यांच्या सहसंपादनामध्ये निघत असे. त्याच्या काही प्रतींवर कन्हैयालाल मुन्शींचे पूर्ण नाव न छापता फक्त 'मुन्शी' छापलेले असायचे. त्यामुळे प्रेमचंदांच्या नावालाही मुन्शी चिकटले. 

प्रेमचंदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय डाकतार विभागातर्फे ३० जुलै १९८०ला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ३० पैसे मूल्याचे एक डाक तिकीट काढले होते. गोरखपुरच्या ज्या शाळेत ते शिक्षक होते तेथे प्रेमचंद साहित्य संस्थेची स्थापना केली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.