मुख्य सामग्रीवर वगळा

परीक्षा पे चर्चा

हा महिना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ आहे , परीक्षेचा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप तणावपूर्ण असतो. परीक्षांव्यतिरिक्त, परफॉर्मेंस ची अपेक्षा, डेडलाइन, कामाचा ताण या सर्व गोष्टी घटक तणाव निर्माण करू शकतात.
तुम्ही ही जर 10/12वी परीक्षेची तयारी करत असाल, तर असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही परीक्षेशी संबंधित ताण कमी करू शकता. आज आपण परीक्षेची भीती कमी करू शकतो 

दररोज अभ्यास करा: तणावावर मात करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय शिक्षण, असाइनमेंट आणि कोर्सवर्कमध्ये अव्वल राहणे महत्त्वाचे आहे. आगामी परीक्षा नसतानाही त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि अभ्यासाचा वेळ त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकाचा भाग बनवावा. त्यांचा अभ्यासाचा योग्य टाइमटेबल असल पाहिजे आणि त्यांनी त्याचे पालन केले पाहिजे.
बोर्डाच्या परीक्षा असल्याकारणाने बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका वाचन करून, स्वरूप समजून घ्या. 

वेळ व्यवस्थापित करा: विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे हे देखील शिकले पाहिजे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी त्यांनी वेळ व्यवस्थापनाचे तंत्र अवलंबले पाहिजे.अनेक विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात, शैक्षणिक कामात किंवा इतर कामांमध्ये उशीर करतात, ज्यामुळे कामाचा ढीग पडतो आणि त्यांच्यावरील तणाव वाढतो. त्यामुळे अनावश्यक ताण टाळण्यासाठी सर्व कामे वेळेवर पूर्ण करावीत.
आजकाल मार्केटमध्ये मिळत असलेल्या सराव पत्रिकेचे वाचन करा नीट समजून घ्या आणि त्यानुसार घरी वेळेचे नियम पाडून सोडून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आई-वडिलांची किंवा मोठ्यांची मदत घ्या.


ध्यान ( Meditation) करा: तणावापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करावी. यामुळे त्यांचे लक्ष केंद्रित करणे वाढते. आणि ते कोणतेही काम कोणत्याही तणावाशिवाय आरामात पूर्ण करू शकतात. त्यांना हवे असल्यास त्यांच्या आवडत्या छंदासाठी थोडा वेळ काढून ते तणावमुक्त राहू शकतात. सकाळी दहा मिनिटे व झोपण्यापूर्वी दहा मिनिटे दिवसभर केलेल्या अभ्यासाला ध्यान धारणेच्या माध्यमातून रिकॅप करण्याची सवय लावा.


पुरेशी झोप घ्या, निरोगी अन्न खा : विद्यार्थ्यांनी याकडे देखील लक्ष दिले पाहिजे की ते निरोगी दिनचर्या पाळत आहेत. तणाव कमी करण्यासाठी त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. तुम्ही दररोज किमान 6-7 तास झोपले पाहिजे. सकस अन्न खाल्ले पाहिजे आणि जंक फूडपासून शक्यतो दूर राहिले पाहिजे. रात्री 7/8 बादाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्या उठल्या खाण्याची सवय तसेच अक्रोड खाल्ल्याने ही थोडी बुद्धी तल्लख होऊ शकते. आवडीचेएखादा चॉकलेटही खावे.


कुटुंब किंवा मित्रांसह वेळ घालवा:अभ्यास करताना जर तुम्हाला खूप ताण वाटत असेल, तर तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता अशा व्यक्तीशी बोलून तणाव कमी करा. आतून तणाव निर्माण करण्यापेक्षा आपले विचार बाहेर येऊ देणे चांगले. कधीकधी, कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे तणाव पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरते.
ही आयुष्याची परीक्षा नसून या पलीकडेही आयुष्यामध्ये खूप काही करण्यासारखे आणि अनेक परीक्षा देण्याच्या असल्याकारणाने या परीक्षेच टेन्शन न घेता या परीक्षेला  सामोरे जावे, हीच अपेक्षा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

#तारे जमी पर -

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.