मुख्य सामग्रीवर वगळा

happy new year नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष किंवा नवीन दिनदर्शिका सुरू होण्याची वेळ किंवा दिवस. या दिवसापासून वर्षाची मोजणी एका अंकाने वाढत.
 बऱ्याच संस्कृतीत हा कार्यक्रम काही प्रमाणात साजरा करतात. सर्वत्र सध्या प्रचलनात असलेल्या ग्रेगरीय दिनदर्शिकेत, १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षची सुरुवात म्हणून चिन्हांकित केला जातो. जुलियन दिनदर्शिका आणि रोमन दिनदर्शिकेत पण १ जानेवारी हाच नवीन वर्षाचा दिवस होता.
इतर संस्कृती त्यांचा पारंपारिक किंवा धार्मिक नवीन वर्षांचा दिवस त्यांच्या स्वतःच्या रूढीनुसार पाळतात आणि कधीकधी नागरी दिनदर्शिकेतील ग्रेगोरियन १ जानेवारी हा दिवस पण साजरा करतात. चीनी नववर्ष, इस्लामिक नवीन वर्ष, पारंपारिक जपानी नवीन वर्ष आणि ज्यू नवीन वर्ष ही अधिक सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत. भारतात आणि इतर देशांत वेगवेगळ्या तारखांवर नवीन वर्ष साजरे करतात. भारतातील अनेक राज्यांत पण नवीव वर्षाचे दिवस वेगवेगळे आहेत.
मराठी, कोंकणी व काही कन्नड भागांमध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो
भारतात अनेक राज्यांत नवीव वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो.  शीख धर्मातील लोक बैसाखी या त्यांच्या नानकशाही दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष साजरा करतात. तमिळ कालदर्शिकेनुसार पुथंडु किंवा पुथुवरुषम पासून नवीन वर्षारंभ होतो त्या दिवशी नव वर्ष साजरा केला जातो. नमीळनाडूतील विविध मंदिर आणि घरांमध्ये उत्सव आयोजित केला जातो. घरांच्या अंगण कोलमनी (
 सजवले जाते. हिमाचल प्रदेश मधील डोगरा लोक चैत्र महिन्यात त्यांचे नवीन वर्ष चैत्य साजरे करतात. आसाम मध्ये रोंगाली बिहू हा एप्रिल मध्ये येणारा नवीन वर्षाचा दिवस आहे.
बंगाली बांधव हे पहेला वैशाखला साजरा करतात. हा बांगलादेशातील राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो हा एप्रिल मध्ये येणारा सण पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांमध्ये बंगाली परंपरा असणाऱ्या लोकांमध्ये धार्मिक धर्मनिरपेक्ष साजरा होतो. केरळ राज्यात विषु हा सण साजरा होतो. कर्नाटक मधील मंगलोर आणि तुलू भाषिक लोक पण विषु साजरा करतात. हे सर्व दिवस गुढी पाडवा याच दिवशी येतात. यांची फक्त नावे वेगळी आहेत. संपूर्ण मराठी प्रांत  व मराठी भाषिक कर्नाटक , तेलंगणा भागांमध्ये गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील व तेलंगणातील काही मराठी भाषिक भाग व संपूर्ण जगातील मराठी बांधव गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात.
उगाडी हा हा कर्नाटाकातील नव वर्ष दिन असतो तो गुडीपाडव्याच्या दिवशी साजरा होतो.
मारवाडी व गुजराती लोक दिवाळी पासून नवीन वर्ष सुरू करतात. सिंधी नव वर्षाची सुरुवात चेटीचंड उत्सवापासून होते. पारशी धर्मात नववर्ष नवरोजच्या रूपात साजरे केले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.