संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संतकवी होते. ते भक्ती, समता, करुणा आणि माणुसकी यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अभंगांतून देवभक्तीबरोबरच तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्याय यांचे तीव्र चित्र दिसते. संत चोखामेळा हे १४व्या शतकातील एक महान भक्तसंत होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा संबंध महार समाजाशी जोडला जातो. त्या काळी अस्पृश्यता आणि जातीय भेद खूप तीव्र होते. अशा परिस्थितीतही त्यांनी भक्तीच्या मार्गाने आत्मिक समता आणि मानवी प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. चोखामेळा यांना केवळ संत म्हणूनच नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेले विचारवंत म्हणूनही महत्त्व आहे.चोखामेळा यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या वर्षी झाला, याबाबत ठोस ऐतिहासिक नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. तरीही ते महाराष्ट्रातील पंढरपूर परिसराशी जोडलेले होते, असे मानले जाते. त्यांच्या काळात समाजात जातीवर आधारित भेदभाव खूप होता. मंदिरात प्रवेश, धार्मिक विधी, सार्वजनिक सन्मान यांपासून अनेक समुदायांना वंचित ठेवले जात होते. अशा वातावरणात चोखामेळा यांनी विठ्ठलभ...
इंग्रजांच्या राजवटीत देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी नागपूर येथे मारबत उत्सव सुरू झाला. प्राचीन काळातील मानवजातीसाठी घातक ठरणाऱ्या रुढी-परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘काळी मारबत’! तर चांगल्या परंपरांचे प्रतीक म्हणजे ‘पिवळी मारबत’. काळ्या मारबतीला १४१ वर्षांचा तर पिवळ्या मारबतीला १३७ वर्षांचा इतिहास आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याच्या दिवशी चांगल्या आणि वाईट प्रतीकांची मिरवणूक काढली जाते, ती म्हणजेच काळी व पिवळी मारबत मिरवणूक. शंभर वर्षांच्या काळात अनेक परंपरा लोप पावत असताना नागपूरने त्यांची मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक पंरपरा कायम ठेवली. अपवाद होता तो फक्त करोना काळातील दोन वर्षांचा. नागपूरने शेकडो वर्षांपासून जपलेल्या बडग्या-मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली. दरवर्षी तान्हा पोळ्याच्या (लाकडी बैलांचा पोळा) दिवशी मिरवणूक काढली जाते. त्यात सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे पुतळ्यांचे देखावे (बडगे) तयार केले जातात. मिरवणुकीच्या समारोपाला त्याचे दहन केले जाते. जुन्या नागपुरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत लाखो नागपूरकरांसह विदर्भातील नागरिक सहभागी होतात. ती एक जत्राच असते. नागपुरातील मारबत मिरवणुकीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन २०१३मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मारबत उत्सवाला मान्यता दिली. त्यामुळे हा उत्सव देश-विदेशात पोहचला. मारबत उत्सव जाणून घेण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक दरवर्षी नागपुरात येतात. तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीच्या निमित्ताने अनेकांना रोजगार मिळतो. बँड पथक, ढोलताशे, डीजे, कारागीर, हातठेलेसह छोट्या विक्रेत्यांना रोजगार मिळतो. लाखो लोकांची गर्दी मिरवणुकीच्या मार्गाने होत असल्याने त्या मार्गावर विविध खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. इतक्या वर्षानंतरही या उत्सावाने आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे.
नागपुर
उत्तर द्याहटवानागपुर मारबत
उत्तर द्याहटवा