पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात .या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.
ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसऱ्या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात.मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी तयार मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात.
रमजान ईदचा दुसरा दिवस हा 'बासी ईद' नावाने ओळखला जातो.इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स. ५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. त्यांनी समस्त मानवजातीला उदारता, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती.मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.
रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.
eid mubarak
उत्तर द्याहटवा